करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? जिम VIDEO व्हायरल होताच चर्चांना उधाण; अखेर टीमने सांगितलं सत्य

करीनाच्या जिम VIDEO मुळे सोशल मीडियावर तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना उधाण आलं. नेटकऱ्यांनी ‘गुड न्यूज’चा अंदाज बांधल्यानंतर अखेर करीनाच्या टीमने यामागचं खरं काय ते स्पष्ट केलं.
करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? जिम VIDEO व्हायरल होताच चर्चांना उधाण; अखेर टीमने सांगितलं सत्य
करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? जिम VIDEO व्हायरल होताच चर्चांना उधाण; अखेर टीमने सांगितलं सत्य
Published on

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. जिममधून बाहेर पडतानाचा तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर करीना तिसऱ्यांदा आई होणार का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. तिच्या दिसण्यावरून काहींनी प्रेग्नन्सीचा अंदाज बांधला, तर काही चाहत्यांनी तर थेट शुभेच्छाही देण्यास सुरुवात केली.

नेमकं काय आहे व्हायरल VIDEO मध्ये?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये करीना जिममधून बाहेर पडताना दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा जिमवेअर परिधान केला असून, तिचा बॉडीगार्ड छत्री घेऊन तिला गाडीपर्यंत सोबत करताना दिसतो.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काही नेटकऱ्यांचे लक्ष करीनाच्या पोटाकडे गेले. त्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये तिच्या प्रेग्नन्सीबाबत अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात झाली.

'करीना प्रेग्नंट आहे का?'

"करीना प्रेग्नंट आहे का?", "कदाचित तिसरं बाळ येणार आहे," अशा प्रतिक्रिया व्हिडीओवर पाहायला मिळाल्या. काही चाहत्यांनी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसतानाही तिला आगाऊ शुभेच्छा दिल्या.

Instagram

करीना-सैफला आहेत दोन मुलं

करीना कपूरने १६ ऑक्टोबर २०१२ रोजी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता सैफ अली खानसोबत लग्नगाठ बांधली. २०१६ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचा, तैमूरचा जन्म झाला. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांना दुसरा मुलगा, जेह झाला. करीना आणि सैफसोबतच तैमूर व जेह यांचाही मोठा चाहतावर्ग आहे. त्यांचीही झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

करीना आणि सैफ यांना दोन मुलं असल्याने करीनाच्या कथित तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चेने सोशल मीडियावर चांगलाच जोर धरला. मात्र, या चर्चांबाबत सुरुवातीला करीना किंवा सैफकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नव्हती. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चांना आणखी उधाण आलं.

अखेर करीनाच्या टीमने दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, करीनाच्या टीमने आता या चर्चांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. करीना प्रेग्नंट नसून ती तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या सोशल मीडियावरील चर्चा चुकीच्या असल्याचे टीमने स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्हायरल व्हिडीओनंतर सुरू झालेल्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in