ब्लॅक साडी अन् बोल्ड कट-आऊट ब्लाऊज; कियारा अडवाणीचा स्टनिंग लूक चर्चेत

कियाराने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली ऑल-ब्लॅक साडी परिधान केली होती. साध्या आणि एलिगंट साडीला कियाराने आपल्या स्टायलिश अंदाजाने ग्लॅमरस टच दिला.
ब्लॅक साडी अन् बोल्ड कट-आऊट ब्लाऊज; कियारा अडवाणीचा स्टनिंग लूक चर्चेत
ब्लॅक साडी अन् बोल्ड कट-आऊट ब्लाऊज; कियारा अडवाणीचा स्टनिंग लूक चर्चेत
Published on

कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी Toxic चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रत्येक प्रमोशनल इव्हेंटमध्ये तिचे हटके आणि स्टायलिश लूक्स पाहायला मिळत आहेत. हैदराबादमध्ये झालेल्या तेलुगू प्री-रिलीज इव्हेंटमध्ये कियाराने ग्लॅमरस गाऊनऐवजी काळ्या रंगाची साडी नेसत पारंपरिक आणि मॉडर्न फॅशनचा सुंदर मेळ साधला.

ब्लॅक साडीत कियाराचा हटके अंदाज

२२ ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये Toxic चा तेलुगू प्री-रिलीज इव्हेंट पार पडला. या कार्यक्रमाला कियारा अडवाणीसोबत यश, हुमा कुरेशी आणि चित्रपटाच्या टीममधील इतर कलाकार उपस्थित होते. यावेळी कियाराने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली ऑल-ब्लॅक साडी परिधान केली होती. साध्या आणि एलिगंट साडीला कियाराने आपल्या स्टायलिश अंदाजाने ग्लॅमरस टच दिला.

कट-आऊट ब्लाऊजने वेधलं लक्ष

कियाराच्या या लूकमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती तिच्या ब्लाऊजची. काळ्या रंगाच्या शीअर लेसपासून तयार केलेल्या या ब्लाऊजला फुल स्लीव्हज आणि डीप स्वीटहार्ट नेकलाइन होती. पारंपरिक साडीला या बोल्ड ब्लाऊजची जोड देत कियाराने आपल्या लूकमध्ये मॉडर्न टच आणला.

एमराल्ड चोकर ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

ऑल-ब्लॅक लूकमध्ये कियाराने दागिन्यांमधून रंगाची झलक दिली. हिरव्या पाचूंसह डायमंड्सचा स्टेटमेंट चोकर तिने गळ्यात घातला होता. यासोबत मॅचिंग इअररिंग्सही परिधान केले होते. काळ्या साडीच्या लूकवर हिरव्या पाचूंच्या दागिन्यांमुळे कियाराचा लूक आणखी उठून दिसत होता.

मिनिमल मेकअप आणि स्लीक बन

साडी आणि दागिन्यांचा लूक आधीच लक्षवेधी असल्याने कियाराने मेकअप साधा आणि एलिगंट ठेवला. डेवी बेस, डिफाइन्ड आयज, हलका ब्लश आणि रोझी लिप्स असा मेकअप तिने केला होता. केसांचा स्लीक बन बांधत तिने आपला लूक पूर्ण केला. त्यामुळे तिचा स्टेटमेंट चोकर आणि ब्लाऊजची नेकलाइन अधिक ठळकपणे दिसत होती.

कियाराचा लूक सोशल मीडियावर चर्चेत

Toxic च्या प्रमोशनदरम्यान कियाराचे एकापेक्षा एक स्टायलिश लूक्स पाहायला मिळत आहेत. हैदराबादमधील ब्लॅक साडी, बोल्ड ब्लाऊज आणि एमराल्ड चोकरच्या कॉम्बिनेशनमुळे तिचा हा लूकही विशेष चर्चेत आला आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in