मुलगी नदीम नाजला का म्हणते 'अब्बा'? ट्रोलिंगला वैतागून माही विजने केला खुलासा, संतापून म्हणाली - "मी थुंकते...

टेलिव्हिजन अभिनेत्री माही विजने तिच्या खासगी आयुष्यावरून पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अलीकडेच पती जय भानुशालीपासून विभक्त झाल्यानंतर माहीने तिचा जवळचा मित्र नदीम नादज (सलमान खानचा मित्र आणि निर्माता) याच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने नदीमला ‘बेस्ट फ्रेंड’ म्हणत “I love you” असे लिहिल्याने दोघांबाबतच्या नात्याबद्दल...
मुलगी नदीम नाजला का म्हणते 'अब्बा'? ट्रोलिंगला वैतागून माही विजने केला खुलासा, संतापून म्हणाली - "मी थुंकते...
Published on

टेलिव्हिजन अभिनेत्री माही विजने तिच्या खासगी आयुष्यावरून पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अलीकडेच पती जय भानुशालीपासून विभक्त झाल्यानंतर माहीने तिचा जवळचा मित्र नदीम नाज (सलमान खानचा मित्र आणि निर्माता) याच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने नदीमला ‘बेस्ट फ्रेंड’ म्हणत “I love you” असे लिहिल्याने दोघांबाबतच्या नात्याबद्दल नेटकऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले. या अफवांवर संताप व्यक्त करत माहीने ट्रोलर्सना उत्तर दिले आहे.

गेल्या सहा वर्षांपासून मी त्याच्यासाठी...

माहीने रविवारी (दि.११) स्वतः इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हटले, “जय आणि मी शांततेत, एकमेकांचा आदर करत विभक्त झालो हे तुम्हा लोकांना पचलं नाही असंच वाटतंय. तुम्हाला कॉन्ट्रोव्हर्सी हवी आहे. तुम्हाला प्रश्न पडलाय अरे हे इतक्या सहज कसं झालं? नदीम माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि कायम राहणार आहे. गेल्या सहा वर्षांपासून मी त्याच्यासाठी पोस्ट करत आहे. तारा सहा वर्षांपासून त्याला 'अब्बा' म्हणते आणि तो निर्णय जय आणि मी, आम्ही दोघांनी घेतला होता. तुम्ही ‘अब्बा’ या शब्दालाच घाण केलं आहे. तुम्हाला कर्माची भीती वाटली पाहिजे. माझ्याबद्दल आणि नदीमबद्दल अशा घाणेरड्या गोष्टी लिहिणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. मी तुम्हाला माझं नाव खराब करून देणार नाही. मला माझं तोंड खराब करायचं नाही. मी थुंकते तुमच्यावर. Shame on you!"

नदीम हा जय भानुशालीचाही जवळचा मित्र

व्हिडिओमध्ये माही पुढे म्हणाली, “लोक बेस्ट फ्रेंड्सना किंवा भावंडांना ‘I love you’ म्हणत नाहीत का? तुम्हाला बेस्ट फ्रेंड म्हणजे काय हेच कळत नसेल, तर go to hell! नदीम हा जय भानुशालीचाही जवळचा मित्र आहे आणि मी स्वतःसाठी उभी राहणार आहे. माझ्याबद्दल आणि माझे हृदय, माझा आत्मा आणि माझे सर्वस्व असलेल्या व्यक्तीबद्दल असे बोलणाऱ्यांसाठी नरक दूर नाही." असेही माही म्हणाली.

आमच्या नात्यात कोणताही ‘व्हिलन’ नाही

दरम्यान, जय भानुशालीनेही माहीची पोस्ट शेअर करत अफवांवर संताप व्यक्त केला. “आमच्या निवेदनात स्पष्ट सांगितलं होतं की, आमच्या नात्यात कोणताही ‘व्हिलन’ नाही. तरीही लोक मुद्दाम जबरदस्तीने व्हिलन तयार करत आहेत. हे थांबवा,” असं जयने म्हटले.

जय आणि माही दोघेही विभक्त

जय आणि माहीने २०१० मध्ये विवाह केला होता. १५ वर्षांच्या सहवासानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना तारा नावाची मुलगी असून राजवीर आणि खुशी ही त्यांनी दत्तक घेतलेली मुले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in