

बॉलिवूड अभिनेत्री ब्युटी क्वीन ऐश्वर्या राय-बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात बऱ्याच काळापासून दुरावा सुरू असल्याचे म्हटले जाते. या गॉसिपच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील वादग्रस्त मौलवी मुफ्ती अब्दुल कावीने एक धक्कादायक विधान केलं आहे. जर ऐश्वर्या आणि अभिषेक वेगळे झाले तर मला ऐश्वर्या लग्नाचा प्रस्ताव पाठवेल असं म्हटले आहे. ज्यामुळे सोशल मिडियावर खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानी पॉडकास्टमधील एका व्हिडिओ क्लिपमध्ये मौलवी कावी म्हणत आहे, “ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात तणाव आहे, असं ऐकतोय. अल्लाह करो असं काही होऊ नये… पण जर दोघांचा घटस्फोट झाला, तर दोन-चार महिन्यांत ऐश्वर्या स्वतः मला निकाहसाठी प्रस्ताव पाठवेल. तसेच तो पुढे म्हणाला, “जर ऐश्वर्या रायने निकाहचा प्रस्ताव दिला, तर मी आधी तिला मुसलमान बनवेन. तिचं नाव ‘आयेशा राय’ ठेवीन आणि मगच निकाह करेन.”
मुफ्ती अब्दुल कावी महिलांच्या बाबतीत अशाच विवादित विधानांसाठी ओळखला जातो. यापूर्वीही त्याने मॉडेल राखी सावंत हिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी तर १४ फेब्रुवारीची तारीख जाहीर करत दावा केला होता की राखी निकाह करेल आणि इस्लाम स्वीकारेल. मात्र, राखीने त्याचे दावे फेटाळून लावले होते आणि म्हटले होते, “मुफ्ती कावीला सहन करणं सोपं नाही.”
कावीच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर संताप आणि टीकेची लाट उसळली आहे. अनेकांनी हे विधान 'पब्लिसिटीसाठीचा स्टंट' असल्याचं म्हटलं असून ऐश्वर्या–अभिषेक यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अशा पातळीवर बोलणं अनुचित असल्याचं मत व्यक्त केलं आहे.