"मी कायदेशीर कारवाई करीन"...जय भानुशालीसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर माही विजचा इशारा

सोशल मीडियावर जय भानुशाली आणि माही विजच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्यानंतर अखेर माही विजनं स्वतः पुढे येत या चर्चांवर मौन तोडलं. म्हणाली, मी कायदेशीर कारवाई...
"मी कायदेशीर कारवाई करीन"...जय भानुशालीसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर माही विजचा इशारा
"मी कायदेशीर कारवाई करीन"...जय भानुशालीसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर माही विजचा इशारा
Published on

मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून विभक्त होणाऱ्या कलाकारांच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यातच अभिनेता जय भानुशाली आणि अभिनेत्री माही विज यांच्या वैवाहिक नात्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. सोशल मीडियावर दोघांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्यानंतर अखेर माही विजनं स्वतः पुढे येत या चर्चांवर मौन तोडलं आहे.

काय घडलं नेमकं?

अलीकडेच ‘thou.ghtful16’ या इंस्टाग्राम पेजवर जय आणि माहीचा त्यांच्या मुलगी तारासोबतचा एक फोटो शेअर करण्यात आला होता. त्यासोबतच "जय भानुशाली आणि माही विज यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असून, दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. ते शेवटचे एकत्र ताराच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसले होते." असं कॅप्शन देण्यात आलं होतं.

ही पोस्ट व्हायरल होताच माही विजने स्वतः त्या पोस्टवर कमेंट करत प्रत्युत्तर दिलं. ती म्हणाली, "उगाच खोट्या बातम्या पोस्ट करू नका, मी याविरुद्ध कायदेशीर कारवाई करेन."

व्हायरल पोस्टवर माहीची प्रतिक्रिया
व्हायरल पोस्टवर माहीची प्रतिक्रिया

या वक्तव्यानंतर तिच्या चाहत्यांनीही तिला पाठिंबा दिला. अनेकांनी कमेंट करत म्हटलं, "तुम्ही नक्कीच कारवाई करा, अशा चुकीच्या बातम्या थांबल्या पाहिजेत."

जयचा व्हिडीओ आणि माहीनं केलेली कमेंट

दरम्यान, या साऱ्या अफवांच्या पार्श्वभूमीवर जय भानुशालीनं आपली लेक तारासोबतचा एक गोड डान्स व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला. कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं "जेव्हा बाबा मुलीबरोबर एकटा असतो, तेव्हा असं व्हायलाच पाहिजे."

हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला, आणि विशेष म्हणजे माही विजनं देखील त्यावर "Tara is the cutest" अशी कमेंट केली. यावर जयने "खरंय" असं उत्तरही दिलं.

या संवादानंतर जय आणि माही यांच्या नात्याबाबत पसरलेल्या अफवा केवळ निराधार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

logo
marathi.freepressjournal.in