लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण; संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद; पाहा Video

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली असून, प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अनुज सचदेव याच्यावर त्याच्याच सोसायटीतील एका व्यक्तीने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. गोरेगाव पश्चिम येथील एका सोसायटीत ही घटना घडली असून, या हल्ल्यात अनुजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण
Published on

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली असून, लोकप्रिय टीव्ही अभिनेता अनुज सचदेव याच्यावर त्याच्याच सोसायटीतील एका व्यक्तीने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. गोरेगाव पश्चिम येथील एका सोसायटीत ही घटना घडली असून, या हल्ल्यात अनुजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ

अनुज सचदेवने काल (दि. १४) स्वतः सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत संपूर्ण प्रकार उघडकीस आणला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याला शिवीगाळ करत मारहाण करताना दिसत असून, हातात काठी घेऊन त्याच्यावर हल्ला केल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. इतकंच नाही तर या व्यक्तीने अनुजच्या पाळीव श्वानालाही मारहाण केल्याचा आरोप अभिनेत्याने केला आहे.

"तुला मारून टाकेन..."

व्हिडीओमध्ये अनुज म्हणतो की, गेल्या एक तासापासून हा माणूस त्याच्यावर हल्ला करत असून, हा प्राणघातक हल्ला आहे. दोन सुरक्षारक्षक त्या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न करत असले तरी तो प्रचंड संतप्त अवस्थेत असल्याचं दिसतं. हल्लेखोर ‘मी तुला मारून टाकेन’ अशी धमकी देत असल्याचंही व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे.

मला काही झाले तर...

या घटनेबाबत अनुजने कॅप्शनमध्ये स्पष्ट केलं आहे की, चुकीच्या ठिकाणी वाहन पार्क केल्याच्या कारणावरून हा वाद उफाळला आणि त्यातूनच हा हल्ला झाला. भविष्यात तो किंवा त्याच्या मालमत्तेला काही इजा झाली, तर हा व्हिडीओ पुरावा म्हणून वापरावा, असं सांगत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. डोक्यातून रक्तस्राव होत असल्याचाही उल्लेख त्याने केला आहे.

अनुजने व्हिडीओ पोस्ट करताच अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. सध्या अनुजच्या प्रकृतीबाबत अधिकृत अपडेट मिळालेली नसल्याने त्याचे चाहते चिंतेत आहेत.

लोकप्रिय मालिकांमधील परिचित चेहरा

अनुज सचदेव हा टेलिव्हिजनवरील परिचित चेहरा असून, त्याने ‘एमटीव्ही रोडीज’मध्ये सहभाग घेतल्यानंतर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘बिदाई’, ‘साथ निभाना साथिया’, ‘प्रतिज्ञा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच ‘छल कपट’ या वेबसीरिजमध्येही त्याची भूमिका प्रेक्षकांनी पाहिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in