"ही तर इच्छाधारी मेट्रो..." ; एकता कपूरच्या Naagin 7 चं हटके प्रमोशन, व्हायरल Videoवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

नागिन ७ (Naagin 7) च्या प्रमोशनसाठी मुंबई मेट्रोचा वापर करण्यात आला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्सही येत आहेत.
"ही तर इच्छाधारी मेट्रो..." ; एकता कपूरच्या Naagin 7 चं हटके प्रमोशन, व्हायरल Videoवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स
"ही तर इच्छाधारी मेट्रो..." ; एकता कपूरच्या Naagin 7 चं हटके प्रमोशन, व्हायरल Videoवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स
Published on

टीव्हीवरील मालिका घराघरांत पोहचवण्यासाठी मालिकेच्या टीमकडून प्रमोशन केलं जातं. प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी अनेकदा पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये मार्केटिंग केली जाते. अशातच, सध्या एका प्रमोशनची जोरदार चर्चा सुरु आहे. हे प्रमोशन ट्रेन किंवा बसमध्ये कोणताही पोस्टर लावून केलं नाहीये तर चक्क मालिकेची थीम बनवून एका मेट्रोला सजवण्यात आलंय. या मेट्रोचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

एकता कपूर यांची लोकप्रिय आणि आयकॉनिक सुपरनॅचरल मालिका नागिन ७ (Naagin 7) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशभरात मोठ्या प्रमोशनसह सुरू झालेल्या नागिन ७ च्या प्रमोशनने आता थेट मुंबई मेट्रोत एंट्री घेतली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये मुंबई मेट्रो लाईन १ (घाटकोपर–वर्सोवा ब्लू लाईन) पूर्णपणे सापाच्या कातडीसारख्या डिझाइनने रॅप केलेली दिसत आहे. या मेट्रो ट्रेनवर ठळक ग्राफिक्स, अ‍ॅनिमेटेड व्हिज्युअल्स आणि नागिन ७ चे मोठे ब्रँडिंग केले आहे. अनेकांनी या ट्रेनला गंमतीने “नागलोकची ट्रेन” असे नाव दिले आहे.

मुंबई मेट्रो ही शहरातील सर्वात गजबजलेल्या मार्गांपैकी एक असल्याने, अशा प्रकारचे हाय-व्हिजिबिलिटी प्रमोशन चर्चेचा विषय ठरले आहे. दरम्यान, मुंबईनंतर दिल्ली मेट्रोमधील असाच एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ एकता कपूर यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

एकता कपूर यांची इन्स्टाग्राम स्टोरी
एकता कपूर यांची इन्स्टाग्राम स्टोरी

नेटिझन्सनी या प्रमोशनवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. कुणी याला “नेक्स्ट लेव्हल मार्केटिंग”, तर कुणी “इच्छाधारी मेट्रो” म्हटले. काहींनी तर “दररोजच्या प्रवासात खरी नागिन दिसली” अशीही खिल्ली उडवली.

या आक्रमक आणि क्रिएटिव्ह आउटडोअर प्रमोशनमुळे नागिन मालिकेची लोकप्रियता पुन्हा अधोरेखित झाली आहे. वर्षानुवर्षे चांगला टीआरपी आणि निष्ठावान प्रेक्षकवर्ग मिळवणाऱ्या या मालिकेची क्रेझ अजूनही तशीच आहे.

'नागिन ७' या मालिकेत नेमकं काय?

बालाजी टेलिफिल्म्स निर्मित नागिन ७ ही मालिका कलर्स टीव्हीवर २७ डिसेंबरला प्रदर्शित झाली आहे. यंदाचा सीझन गूढ, सूड आणि सुपरनॅचरल ड्रामाने भरलेला आहे. या मालिकेत प्रियंका चाहर चौधरी ‘अनंता’ या मुख्य नागिनच्या भूमिकेत दिसत असून, तेजस्वी प्रकाश यांचा कॅमिओही आहे. त्यांच्यासोबत नामिक पॉल आणि ईशा सिंह महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in