मुंबई विमानतळावर रडताना दिसली नोरा फतेही; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

नेहमी आपल्या ग्लॅमरस लूकसाठी चर्चेत असणारी नोरा फतेही यावेळी वेगळ्याच कारणामुळे लक्षात आली. मुंबई विमानतळावर ती भावुक अवस्थेत दिसली आणि तिच्या डोळ्यांत अश्रू होते. अचानक काय घडलं, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
मुंबई विमानतळावर रडताना दिसली नोरा फतेही; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Published on

नेहमीच आपल्या ग्लॅमरने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये ती रविवारी मुंबई विमानतळावर अचानक भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. नेहमीप्रमाणे हसतमुख दिसणारी नोरा यावेळी काळ्या कपड्यांमध्ये, डोळ्यांवर गॉगल लावून थोडी उदास आणि गहिवरलेली दिसली.

विमानतळावर तिच्या आजूबाजूला चाहत्यांची गर्दी झाली होती. एका चाहत्याने सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला असता, तिच्या बॉडीगार्डने त्याला दूर केल्याचा प्रसंगही कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो व्हिडिओही सध्या चर्चेत आहे.

PM

याआधी तिने तिच्या इंस्टा स्टोरीवर 'इन्ना लिल्लाही वा इन्ना इलाही राजीऊन' (Inna Lillahi wa inna ilayhi raji'un) हे अरबी वाक्य लिहिले होते, ज्याचा अर्थ 'आम्ही अल्लाहचे आहोत आणि अल्लाहकडेच परत जाणार आहोत' असा होतो. इस्लाम धर्मात हे वाक्य एखाद्याच्या निधनाची बातमी मिळाल्यावर उच्चारले जाते. त्यामुळेच, तिच्या या पोस्टनंतरच तिच्या जवळच्या व्यक्तीच्या निधनाबद्दलच्या चर्चा आहेत. मात्र, यावर नोराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर नोरा नुकतीच ‘द रॉयल्स’ या नेटफ्लिक्सवरील वेबसीरिजमध्ये झळकली होती. याशिवाय तिचे एक कन्नड चित्रपटातले कामही लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

सध्या तिच्या या भावनिक व्हिडिओवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, अनेकजण तिला धीर देताना दिसत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in