"तुमच्या मुलीच्या वयाची आहे मी..."; लाइव्ह शोमध्ये प्रेक्षकांवर भडकली हरियाणवी गायिका; पाहा Video

हरियाणवी गायिका आणि नृत्यांगना प्रांजल दहिया एका स्टेज शोमध्ये परफॉर्म करत होती. तिच्या रंगतदार परफॉर्मन्सदरम्यान काही प्रेक्षकांनी मर्यादा ओलांडून गैरवर्तन केले. हे पाहून प्रांजलचा संयम सुटला. तिने गाणं अर्ध्यातच थांबवलं आणि माईक हातात घेऊन प्रेक्षकांना चांगलच सुनावलं.
"तुमच्या मुलीच्या वयाची आहे मी..."; लाइव्ह शोमध्ये प्रेक्षकांवर भडकली हरियाणवी गायिका; पाहा Video
Published on

'मेरा बालम ठाणेदार' या हिट गाण्यामुळे चाहत्यांच्या मनात वेगळीच ओळख निर्माण केलेली हरियाणवी गायिका आणि नृत्यांगना प्रांजल दहिया, अलिकडेच एका लाईव्ह परफॉर्मन्समुळे चर्चेत आली. स्टेजवर तिच्या रंगतदार परफॉर्मन्सदरम्यान काही प्रेक्षकांनी मर्यादा ओलांडून गैरवर्तन केले. यामुळे तिने कार्यक्रम थांबवत असभ्य वर्तन करणाऱ्यांना खडे बोल सुनावले. सध्या हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

प्रांजल एका स्टेज शोमध्ये परफॉर्म करत होती. काही प्रेक्षकांनी तिच्यावर अश्लील कमेंट्स केले आणि स्टेजच्या खूप जवळ येऊन गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून प्रांजलचा संयम सुटला. तिने गाणं अर्ध्यातच थांबवलं आणि माईक हातात घेऊन प्रेक्षकांना चांगलच सुनावलं .

व्हायरल व्हिडिओत प्रांजल संतप्त दिसतेय. एका व्यक्तीला उद्देशून तिने म्हटलं, "काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे, थोडा विचार करा, स्वतःवर कंट्रोल ठेवा.” नंतर एका तरुणालाही सुनावलं, “तोंड काय फिरवतोयस, मी तुलाच सांगतेय. तुझ्या घरातही आई-बहिणी आहेत, हे लक्षात ठेव.” पुढे तिने सर्व प्रेक्षकांना आवाहन केलं, “सर, कृपया थोडा वेळ स्टेजपासून दूर राहा, आमचा परफॉर्मन्स अजून बाकी आहे. मोकळेपणाने आनंद घ्या, पण आम्हाला थोडे सहकार्य करा.”

प्रांजलने स्पष्ट केले की, “आम्ही कलाकार आहोत, तुमच्या मनोरंजनासाठी परफॉर्म करतो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमचा आदर करणार नाही. आम्हाला सहकार्य करा, तरच आम्ही पुढील परफॉर्मन्स देऊ शकू.”

व्हायरल Video इथे पाहा

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रांजलच्या धैर्याचं आणि ठाम व्यक्तिमत्त्वाचं कौतुक करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in