१७ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याला विराम! गायक राहुल देशपांडेचा घटस्फोट; मुलीबाबतही खास भाष्य

Rahul Deshpande Divorce : प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे सध्या वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आहे. १७ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याला विराम देत पत्नी नेहा देशपांडे यांच्याशी परस्पर संमतीने घटस्फोट घेतल्याची माहिती इन्स्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांशी शेअर केली आहे.
१७ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याला विराम! गायक राहुल देशपांडेचा घटस्फोट; मुलीबाबतही खास भाष्य
Published on

पंडित वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि शास्त्रीय तसेच नाट्यसंगीताचा वारसा पुढे नेणारा प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे सध्या वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आहे. त्यांच्या दमदार आणि भावपूर्ण आवाजामुळे शास्त्रीय संगीताची ओढ असलेल्यांपासून तरुण प्रेक्षकांपर्यंत सर्वांच्याच मनात त्यांनी घर केले आहे. मात्र, नुकतीच त्यांनी १७ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याला विराम देत पत्नी नेहा देशपांडे यांच्याशी परस्पर संमतीने घटस्फोट घेतल्याची माहिती इन्स्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांशी शेअर केली आहे.

राहुल देशपांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले:

"प्रिय मित्रांनो, तुम्ही प्रत्येकजण माझ्या प्रवासात एक अर्थपूर्ण भाग राहिला आहात, त्यामुळे मी तुमच्याशी एक वैयक्तिक आणि महत्त्वाची अपडेट शेअर करू इच्छितो. तुमच्यापैकी काहींना ही बातमी मी आधीच शेअर केली आहे. लग्नाच्या १७ वर्षांनंतर आणि असंख्य आठवणींनंतर, नेहा आणि मी परस्पर सहमतीने वेगळे झालो आहोत. यापुढे स्वतंत्रपणे आम्ही आमची आयुष्ये जगू.

सप्टेंबर २०२४ मध्ये आम्ही कायदेशीररित्या वेगळे झालो. मी ही अपडेट शेअर करण्यापूर्वी थोडा वेळ घेतला, जेणेकरून हा बदल मला स्वीकारता येईल. खासकरून आमची मुलगी रेणुकाच्या, हिताच्या दृष्टीने. ती आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे."

राहुल देशपांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये आपल्या मुलीबद्दलची भावना व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "तिला प्रेम, पाठिंबा व स्थिर आयुष्य देण्यासाठी, मी नेहाबरोबर सह-पालक म्हणून जबाबदाऱ्या पार पाडण्यास वचनबद्ध आहे. वैयक्तिकरित्या आमच्यासाठी एक नवीन अध्याय सुरू होत आहे. पण आई-वडील म्हणून आमचा बाँड आणि एकमेकांबद्दलचा आदर आधीसारखाच असेल." ते पुढे म्हणाले, या काळात आमच्या प्रायव्हसी आणि निर्णयाबद्दल तुम्ही दाखवलेला समजूतदारपणा आणि आदराचं मी कौतुक करतो.

राहुल आणि नेहा यांच्या घटस्फोटाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी ही बातमी अनपेक्षित असल्याचं मानलं जातंय..

logo
marathi.freepressjournal.in