Durga: संदीप खरेंची मुलगी 'दुर्गा’ बनून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; कुटुंबावरील अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणार!

Upcoming Marathi Serial: सुख आणि सूड अशा द्वंद्वात अडकलेली, आपल्या कुटुंबासाठी सर्वकाही पणाला लावून त्यांना न्याय मिळावा म्हणून लढणाऱ्या दुर्गावर आधारित ही मालिका आहे.
Durga: संदीप खरेंची मुलगी 'दुर्गा’ बनून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; कुटुंबावरील अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणार!
Published on

Sandeep Khare Daughter New Serial: छोटा पडदा म्हटलं की मालिका या आल्याचं. रियालिटी शो सोबत सध्या मालिकांची चलती आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी एकामागून एक नवीन मालिका येत आहेत. नुकतंच 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये 'भाऊच्या धक्क्या'वर रितेश देशमुखने 'कलर्स मराठी'च्या नव्या लूकचं अनावरण केलं आहे. या फ्रेश लूकसोबत काही नवे कार्यक्रम आणि मालिकादेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

कलर्स मराठी वर 'दुर्गा' ही नवी मालिका येणार आहे. या मालिकेचा दमदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुख आणि सूड अशा द्वंद्वात अडकलेली, आपल्या कुटुंबासाठी सर्वकाही पणाला लावून त्यांना न्याय मिळावा म्हणून लढणाऱ्या दुर्गावर आधारित ही मालिका आहे. आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध दुर्गा कशी घेणार हे जाणून घेणे उत्सुकतेचे असणार आहे.

Durga: संदीप खरेंची मुलगी 'दुर्गा’ बनून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; कुटुंबावरील अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणार!
स्वातंत्र्यदिनी Bharat Jadhav करणार नाटकांचा ट्रिपल धमाका! एकाच दिवशी सादर करणार तीन प्रयोग

कोण आहे मालिकेतील कलाकार?

दुर्गाच्या भूमिकेत संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे झळकणार असून मालिकेचा नायक अभिषेकची भूमिका अंबर गणपुले साकारणार आहे. तसेच शिल्पा नवलकर, राजेंद्र शिसतकर आणि वृंदा गजेंद्र देखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

Durga: संदीप खरेंची मुलगी 'दुर्गा’ बनून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; कुटुंबावरील अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणार!
कशाप्रकारे निवडले गेले देशाचे पहिले पंतप्रधान? येतेय भारताच्‍या स्‍वातंत्र्याची रोचक कथा दाखवणारी सिरीज
Durga: संदीप खरेंची मुलगी 'दुर्गा’ बनून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; कुटुंबावरील अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणार!
Superstar Singer: आता सुरु होणार 'मराठी सुपरस्टार सिंगर', जाणून घ्या ऑडिशन्सच्या डिटेल्स

'दुर्गा' हे पात्र साकारणारी रूमानी खरे म्हणाली ,"मालिकेचं कथानक ऐकल्या क्षणी आवडलं. 'दुर्गा' हे पात्र वेगळं आहे. स्वत:ची मतं ठामपणे मांडू शकणारी, स्वत:साठी उभी राहणारी अशी 'दुर्गा' आहे. 'दुर्गा'च्या माध्यमातून चांगल्या माणसांसोबत छान काम करता येत आहे. मुळात कोणतीही गोष्ट उभी राहताना पडद्यामागच्या कलाकारांची मेहनत खूप महत्त्वाची असते. सेटवर असणारी सकारात्मकता उत्तम काम करण्यासाठी प्रोत्साहन देते. 'दुर्गा' हे पात्र साकारताना मला मजा येतेय. प्रेक्षकांना देखील हे पात्र नक्कीच आवडेल".

logo
marathi.freepressjournal.in