Bigg Boss Marathi 6 : श्रेयस तळपदे जाणार 'बिग बॉस'च्या घरात? अभिनेत्याने स्वतःच सांगितलं, "लोक प्रसिद्धीसाठी काहीही करतात"

श्रेयस स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात जाणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. आता यावर स्वतः श्रेयसने खुलासा केला आहे...
श्रेयस तळपदे जाणार 'बिग बॉस'च्या घरात? अभिनेत्याने स्वतःच सांगितलं
श्रेयस तळपदे जाणार 'बिग बॉस'च्या घरात? अभिनेत्याने स्वतःच सांगितलं
Published on

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन (Bigg Boss Marathi 6) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, मराठी आणि बॉलिवूडचा सुपरस्टार श्रेयस तळपदेचे नाव चर्चेत आहे. श्रेयस स्पर्धक म्हणून घरात जाणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. आता यावर स्वतः श्रेयसने खुलासा केला आहे.

"प्रसिद्धीसाठी लोकं काहीही करतील.." श्रेयसची प्रतिक्रिया

काही माध्यमांमध्ये, श्रेयस तळपदे याने 'बिग बॉस मराठी ६' मध्ये स्पर्धक म्हणून जाण्यासाठी होकार दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. आता यावर श्रेयसनेच खुलासा केला आहे. याबद्दल 'झूम'शी बोलताना श्रेयसने या निव्वळ अफवा असल्याचे सांगितले. तो म्हणाला, "आजकाल अशा गोष्टी घडणं सामान्य झालं आहे. या केवळ अफवा आहेत. कृपया याकडे दुर्लक्ष करा. दुर्दैवाने, कलाकारांना सहज टार्गेट केलं जातं आणि काही लोक प्रसिद्धीसाठी काहीही करतात."श्रेयसच्या या स्पष्ट उत्तरामुळे चाहत्यांमध्ये थोडी निराशा निर्माण झाली असली, तरी वास्तविक माहिती समोर आल्याने चर्चेला विराम मिळाला आहे.

यावेळी एकाहून एक अनपेक्षित ट्विस्ट - निर्मात्यांची ग्वाही

अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करीत असलेल्या 'बिग बॉस मराठी ६' ग्रँड प्रीमियर ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. जरी श्रेयस तळपदे यात स्पर्धक म्हणून दिसणार नसला, तरी या सीझनमध्ये अनेक मोठे चेहरे आणि अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत, अशी ग्वाही निर्मात्यांनी दिली आहे. सध्या चर्चेत असलेल्या संभाव्य सहभागी यादीत राकेश बापट, विशाल कोटियन, दीपाली सय्यद, संकेत पाठक, सागर कारंडे आणि सोनाली राऊत यांचा समावेश आहे, पण निर्मात्यांनी अद्याप अंतिम स्पर्धक यादी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in