बापरे! सोनू सूदने पकडला साप; नेटकरी म्हणाले, ''माणसांनतर आता प्राण्यांनाही...''

अभिनेता सोनू सूद हा केवळ आपल्या अभिनयामुळेच नव्हे, तर समाजसेवेतील योगदानामुळेही नेहमीच चर्चेत असतो. लॉकडाऊनपासून अनेक गरजूंना मदत करत त्याने ‘रियल हिरो’ ही ओळख निर्माण केली. आता त्याचा आणखी एक गुण नेटकऱ्यांसमोर आला आहे. सोनूला सापही पकडता येतो, हे त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमार्फत समोर आले आहे.
बापरे! सोनू सूदने पकडला साप; नेटकरी म्हणाले, ''माणसांनतर आता प्राण्यांनाही...''
Published on

अभिनेता सोनू सूद हा केवळ आपल्या अभिनयामुळेच नव्हे, तर समाजसेवेतील योगदानामुळेही नेहमीच चर्चेत असतो. लॉकडाऊनपासून अनेक गरजूंना मदत करत त्याने ‘रियल हिरो’ ही ओळख निर्माण केली. आता त्याचा आणखी एक गुण नेटकऱ्यांसमोर आला आहे. सोनूला सापही पकडता येतो, हे त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमार्फत समोर आले आहे.

सोनू सूदच्या सोसायटीत एक लांबलचक मोठा साप आढळून आला. यावेळी कोणतीही गोंधळाची परिस्थिती निर्माण न करता, सोनूने अत्यंत संयम आणि दक्षतेने त्या सापाला स्वतःच्या हाताने पकडलं. विशेष म्हणजे, या साप रेस्क्यूचा व्हिडिओ त्याने स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने 'हर हर महादेव' अशी Caption दिली आहे.

व्हिडिओमध्ये सोनू अत्यंत शांतपणे साप हाताळताना दिसतो. तो या सापाची माहिती देताना सांगतो, की हा rat snake आहे. हा बिनविषारी साप असतो. मात्र, अशा प्रसंगी काळजी घेणे गरजेचे आहे. त्याने पुढे सांगितलं, हा साप काही वेळा आपल्या सोसायटीमध्ये आढळतो. मला थोडंफार येतं म्हणून मी पकडलं, पण अशावेळी नेहमी प्रशिक्षित सर्पमित्रांनाच बोलवा. Be careful!

या घटनेनंतर सोनूने त्या सापाला एका पिशवीत व्यवस्थित बांधले आणि जंगलात सोडण्यासाठी घेऊन गेला. या कृतीतून त्याने केवळ धाडसच दाखवले नाही, तर प्राणीमात्रांप्रती असलेली संवेदनाही अधोरेखित केली.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याच्या या कृतीचं भरभरून कौतुक केलं आहे. 'सोनू आता माणसांनंतर प्राण्यांनाही घरी सोडत आहे' अशा मजेशीर आणि कौतुकास्पद प्रतिक्रिया ट्रेंडमध्ये आहेत.

logo
marathi.freepressjournal.in