'तो स्पष्ट नाराज दिसतोय!'; एपी ढिल्लोंने ताराला Kiss केल्यानंतर वीर पहारियाची प्रतिक्रिया व्हायरल | Video

अलीकडेच तारा आणि वीर हे प्रसिद्ध पंजाबी गायक एपी ढिल्लों यांच्या मुंबईतील कॉन्सर्टला उपस्थित होते. या कॉन्सर्टमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यातील एका व्हिडीओने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.
'तो स्पष्ट नाराज दिसतोय!'; एपी ढिल्लोंने ताराला Kiss केल्यानंतर वीर पहारियाची प्रतिक्रिया व्हायरल | Video
Published on

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेता वीर पहारिया गेले काही महिने एकमेकांना डेट करत आहेत. सुरुवातीला दोघांनी आपलं नातं खासगी ठेवलं होतं. मात्र, यावर्षी जुलै महिन्यात त्यांनी अधिकृतपणे आपल्या नात्याची कबुली दिली. त्यानंतर दोघेही सोशल मीडियावर एकत्र रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत आहेत.

अलीकडेच तारा आणि वीर हे प्रसिद्ध पंजाबी गायक एपी ढिल्लों यांच्या मुंबईतील कॉन्सर्टला उपस्थित होते. या कॉन्सर्टमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यातील एका व्हिडीओने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये एपी ढिल्लों स्टेजवरून ताराला बोलावताना दिसतो. त्यानंतर तारा स्टेजवर एन्ट्री घेत एपीसोबत परफॉर्म करते. यावेळी खाली प्रेक्षकांमध्ये उभा असलेला वीर पहारिया सतत स्टेजकडे पाहत असल्याचं स्पष्ट दिसतं.

मिठी मारत गालावर Kiss...

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तारा खूपच सुंदर दिसत होती. ती स्टेजवर येताच संपूर्ण कॉन्सर्टचं वातावरण आणखी उत्साही झालं. परफॉर्मन्सदरम्यान एपी ढिल्लोंने ताराला मिठी मारली आणि तिच्या गालावर किस केलं. हाच क्षण सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.

वीरची प्रतिक्रिया चर्चेचा विषय

या सगळ्या घडामोडी दरम्यान खाली उभा असलेला वीर पहारिया सतत स्टेजकडे पाहत असल्याचं दिसतं. काही प्रेक्षकांना त्याची प्रतिक्रिया अगदी सामान्य वाटली, मात्र अनेक सोशल मीडिया युजर्सनी त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव वेगवेगळ्या अर्थाने घेतले. व्हायरल व्हिडीओमध्ये वीर काहीसा अस्वस्थ आणि चिडलेला दिसत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. तो एपी ढिल्लोंचं गाणं लिप-सिंक करताना दिसतो, पण तारा आणि एपी ढिल्लों यांचं स्टेजवरील जवळ येणं त्याला फारसं आवडलं नाही, असं त्याच्या चेहऱ्यावरून जाणवत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

स्टेजवर डान्स आणि वाढलेली चर्चा

यानंतर तारा आणि एपी ढिल्लों स्टेजवर एकत्र डान्स करतानाही दिसतात. एपी आपल्या हिट गाण्यांवर परफॉर्म करत असताना तारा त्याच्यासोबत ठेका धरते. एका क्षणी ताराने एपीच्या खांद्यावर हात ठेवल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं. यामुळे कॉन्सर्टचं वातावरण आणखीनच एनर्जेटिक झाल्याचं पाहायला मिळालं.

नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

या संपूर्ण प्रकारावर सोशल मीडियावर मजेशीर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 'वीर स्पष्ट नाराज दिसतोय','स्टेजवर फ्लर्टिंग जरा जास्तच झालं' अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असून, तारा-वीर आणि एपी ढिल्लों यांच्याभोवतीची चर्चा अधिकच रंगत चालली आहे.

logo
marathi.freepressjournal.in