A Valentine s Day: ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ हा थरारपट सर्वत्र प्रसिद्ध, चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा

Marathi Movie: थरार, उत्कंठा, शोध या सगळ्या प्रेमाच्या खेळातून अनुत्तरित प्रश्नांचा शोध घेणारा मिस्टर जोकर एंटरटेनमेंट प्रोडक्शन् अंतर्गत ‘अ व्हॅलेंटाईन्स डे' हा थरारपट २१ जूनला प्रदर्शित झाला आहे.
A Valentine s Day: ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ हा थरारपट सर्वत्र प्रसिद्ध, चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा

प्रेमाच्या खेळात कोण जिंकत तर कोण हरत. आपण जो विचार करतो त्यापलीकडे जाऊन आपल्या आजुबाजूला भयंकर प्रेमाच्या आगळ्या वेगळ्या घटना घडत असतात. भीतीदायक वाटणाऱ्या घटनांमागचं नेमकं रहस्य काय असणार? याची उकल करताना थरार, उत्कंठा, शोध या सगळ्या प्रेमाच्या खेळातून अनुत्तरित प्रश्नांचा शोध घेणारा मिस्टर जोकर एंटरटेनमेंट प्रोडक्शन् अंतर्गत ‘अ व्हॅलेंटाईन्स डे' हा थरारपट २१ जूनला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती फैरोज माजगांवकर यांनी केली असून दिग्दर्शन रोहितराव नरसिंगे यांचे आहे. हास्यजत्रा फेम अभिनेता अरुण कदम, संजय खापरे, सुरेश विश्वकर्मा, अभिजित चव्हाण, अभिनेता आणि निर्माता फैरोज माजगावकर, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, चैताली चव्हाण आदि कलाकारांच्या भूमिका ‘अ व्हॅलेंटाईन्स डे' चित्रपटात आहेत. या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा नुकताच पुण्यात पार पडला. या वेळेस अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संगीत दिग्दर्शक ऍलेन के पी, फतवा फेम अभिनेता प्रतीक गौतम, चित्रपटातील दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे, कलाकार व अन्य मान्यवर उपस्थित होते.

हा चित्रपट आज मुंबई सह महाराष्ट्रातील पुणे, पनवेल, रत्नागिरी, नाशिक, परभणी, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद या जिल्ह्यातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

रोमांचक प्रेमाचे सुप्त आकर्षण प्रत्येकाला असतेच. मोशन पोस्टरपासूनच उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. प्रदर्शित झालेल्या या ट्रेलर मधून सगळ्या कलाकारांची जबरदस्त झलक दिसून येत आहे. अल्पावधीतच चित्रपटाचा ट्रेलर ट्रेंडिंगला गेला.  व्हॅलेंटाईन्स डे दिवशी गायब झालेल्या मुलींचं पुढे काय होत? त्या सापडतात की नाही. अशी रहस्यमय कथा उलगडणारा ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ हा थरारपट आहे. एका रहस्याची उकल करताना त्यांच्या भोवती वेगवेगळ्या धक्कादायक घटनांची मालिका सुरु होते.  सरतेशेवटी एकदम ध्यानीमनी नसलेली गोष्ट समोर येते. या घटनेची  उकल कशी होते ? सत्य काय आहे? उत्कंठा, शोध, यातून कोणतं ‘रहस्य’ उलगडणार? हे ‘अ व्हॅलेंटाईन्स डे' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

A Valentine s Day: ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ हा थरारपट सर्वत्र प्रसिद्ध, चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा
New York Times Square: ‘हा’ चित्रपट ठरला ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणारा पहिला मराठी चित्रपट!

गोल्डन स्ट्राईप्स एंटरटेनमेंट एलएलपी, प्रस्तुतकर्ते एम आर जोकर एंटरटेनमेंट एल एल पी सोबत सहयोगी अनिल एन वहाने फिल्म्स प्रोडक्शन्स आणि कियान फिल्म्स & एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेचे श्री.फैरोज अनवर माजगावकर, श्री.अमजद हुसैन निराळे, श्री.श्रीकांत सिंह आणि सह निर्माते म्हणून श्री.अनिल वहाने आणि श्री.सुनील यादव ‘अ व्हॅलेंटाईन्स डे' या चित्रपटाचे निर्माते आहेत. साई पियुष,ऍलेन के पी ऊर्फ सिद्धार्थ पवार आणि निरंजन पेडगावकर हे संगीत दिग्दर्शक आहे. तसेच ‘ब्लू लाइन म्यूजिक’ ही म्युझिक पार्टनर कंपनी आहे.

A Valentine s Day: ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ हा थरारपट सर्वत्र प्रसिद्ध, चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा
A Valentine s Day: सीरियल किलर की आहे प्रेमाचा खेळ? ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून हे ‘रहस्य’ प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल असा विश्वास दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे यांनी चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्यात बोलताना व्यक्त केला. आणि चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा देखील त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in