बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रमाकांत दायमा काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वात शोककळा

त्यांच्या निधनाची माहिती अभिनेत्री आणि त्यांची मैत्रीण शुभांगी लाटकर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रमाकांत दायमा काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वात शोककळा
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रमाकांत दायमा काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वात शोककळा(Photo-X)
Published on

ज्येष्ठ अभिनेते रमाकांत दायमा यांचे २६ मे रोजी निधन झाले. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमीवर आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवणाऱ्या दायमा यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. दीर्घ आजाराशी झुंज देत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांसह कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या निधनाची माहिती अभिनेत्री आणि त्यांची मैत्रीण शुभांगी लाटकर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली.

शुभांगी लाटकर यांची भावनिक पोस्ट

व्हिडीओसोबत शुभांगी यांनी लिहिले, "आज आपण एक अत्यंत सुंदर आत्मा गमावला आहे आणि माझ्याकडे शब्दच नाहीत. रमाकांत दायमा हे फक्त माझे जवळचे मित्र आणि कौटुंबिक मित्र नव्हते, तर मी ज्यांचा मनापासून आदर करत होते अशी व्यक्ती होते."

"प्रत्येक अडचणीमध्येही आयुष्याचा आनंद कसा घ्यायचा हे त्यांना चांगले माहीत होते. ते उत्स्फूर्त नर्तक, भावपूर्ण गायक, उत्कृष्ट अभिनेते आणि माझ्यासाठी कायम अर्थपूर्ण सल्ला देणारे मार्गदर्शक होते," असेही त्यांनी लिहिले.

अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची आठवण

त्यांच्यासोबतच्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टींची आठवण सांगताना शुभांगी पुढे म्हणाल्या, "दिसायला ते लहान वाटत असले तरी मी पाहिलेल्या सर्वात धाडसी आणि मजबूत व्यक्तींमध्ये ते एक होते. अनेक महिन्यांपासून ते आजारी असल्याचं आम्हाला माहिती होतं, पण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात आशा कायम होती."

"आमचे अनेक प्लॅन्स अपूर्ण राहिले. अनेक वर्षांनंतर पुन्हा त्यांच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा होती. आम्ही एक सुंदर हिंदी नाटक एकत्र करण्याचा निर्णय घेतला होता. मी विनंती केल्यावर ते हसून म्हणाले होते, 'Let me get well soon.' आम्ही स्टेजवर निवडक सुंदर कविता सादर करण्याचाही विचार केला होता. ते स्वप्नही आता अपूर्णच राहिलं," असे त्यांनी भावनिक शब्दांत लिहिले.

विविध गाजलेल्या भूमिकांमुळे प्रसिद्ध

ज्येष्ठ अभिनेते रमाकांत दायमा यांनी 'चक दे इंडिया', 'स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी', 'राम सेतू', 'धनक', ‘'ब्रदर्स', 'द ट्रायल', 'क्रू', 'फर्जी', 'मुंबई सागा', 'द चार्जशीट' या चित्रपटांमध्ये काम केले होते. तसेच विविध गाजलेल्या नाटकांमधील त्यांच्या अभिनयालाही विशेष दाद मिळाली होती.

याशिवाय, २००० च्या दशकाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या 'सेंटर फ्रूट' जाहिरातींमधील त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे ते घराघरांत परिचित चेहरा बनले होते.

अभिनेत्री यशस्विनी दायमा यांचे वडील

अभिनय क्षेत्रासोबतच रमाकांत दायमा हे अभिनेत्री आणि इन्फ्लुएन्सर यशस्विनी दायमा यांचे वडील म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

logo
marathi.freepressjournal.in