ट्विटरची चिमणी उडाली भुर्र! लोगोवर आता कुत्र्याचा फोटो

मंगळवारी पहाटे अनेक युझर्सना आपले ट्विटर अकाऊंट हॅक झाले की काय? असा प्रश्न पडला. पण नंतर स्वत: एलन मस्कने एक ट्विट करत युजर्सचा संभ्रम दूर केला.
ट्विटरची चिमणी उडाली भुर्र! लोगोवर आता कुत्र्याचा फोटो

एलन मस्कने ट्विटरचा पदभार स्वीकारल्यापासून ब्लू टिक सबस्क्रिप्शन असो किंवा कर्मचाऱ्यांची कपात याविषयी ट्विटरमध्ये अनेक बदल केले. आता मंगळवारी त्यांनी ट्विटर युझर्सना पुन्हा एकदा झटका देत लोगोमध्ये बदल करत चिमणीऐवजी कुत्र्याचा फोटो वापरला आहे. त्यामुळे आता ट्विटरची चिमणी भुर्र उडाली असून, युझर्सना श्वानाच्या फोटोसह ट्विटर वापरावे लागणार आहे.

मंगळवारी पहाटे अनेक युझर्सना आपले ट्विटर अकाऊंट हॅक झाले की काय? असा प्रश्न पडला. पण नंतर स्वत: एलन मस्कने एक ट्विट करत युजर्सचा संभ्रम दूर केला. त्यानंतर आता ट्विटरच्या लोगोवर चिमणीऐवजी श्वान झळकणार आहे, याची खात्री युझर्सना पटली. एलॉन मस्क यांनी एक मीम शेअर करत ही माहिती दिली. मीममध्ये श्वान कारच्या चालकाच्या जागेवर बसून आपले ओळखपत्र वाहतूक पोलिसांना दाखवत आहे. ओळखपत्रात चिमणीचा लोगो असलेल्या ट्विटरचा फोटो आहे यावर स्पष्टीकरण देताना श्वान म्हणतो, “तो माझा जुना फोटो आहे.” हा मीम पाहून ट्विटरच्या लोगोमध्ये बदल झाल्याचे निश्चित झाले आणि जेव्हा ट्विटरच्या वेब पेज व होम पेजवरील लोगो बदलला गेला, तेव्हा हा प्रकार अनधिकृत नसून विचारपूर्वक केलेला बदल आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले.

वचन दिल्याप्रमाणे लोगो बदलला - मस्क

चेअरमन नावाच्या ट्विटर हँडलवरून वापरकर्त्याने मस्क यांना ट्विटर विकत घेऊन पक्ष्याऐवजी श्वानाचा लोगो ठेवा, असे काही महिन्यांपूर्वी सुचवले होते. यावर सध्या हे योग्य ठरणार नाही, असे मिश्कीलपणे उत्तर मस्क यांनी दिले होते. मात्र आता तोच स्क्रीनशॉट शेअर करत त्यांनी आपण आपले वचन पूर्ण केल्याचे म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in