कतारमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू; एक जण बेपत्ता, शोधमोहीम सुरू

कतारच्या प्रादेशिक जलक्षेत्रात रविवारी पहाटेच्या सुमारास एका हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून, या हेलिकॉप्टरमधील एक व्यक्ती अजूनही बेपत्ता असल्याचे कतारच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
कतारमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू; एक जण बेपत्ता, शोधमोहीम सुरू
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

दोहा : कतारच्या प्रादेशिक जलक्षेत्रात रविवारी पहाटेच्या सुमारास एका हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून, या हेलिकॉप्टरमधील एक व्यक्ती अजूनही बेपत्ता असल्याचे कतारच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या हेलिकॉप्टरमध्ये एकूण सात प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच कतारच्या संरक्षण मंत्रालयाने तातडीने शोध आणि बचाव मोहीम सुरू केली आहे. या हेलिकॉप्टरमधील एक व्यक्ती अजूनही बेपत्ता असल्याचे कतारच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे. हे अभियान कोस्ट्स आणि बॉर्डर्स सिक्योरिटीचे जनरल डायरेक्टरेटचे समुद्री शोध आणि बचाव पथक आणि अंतर्गत सुरक्षा दलाच्या कतार आंतरराष्ट्रीय शोध आणि बचाव पथकाच्या समन्वयाने सुरू आहे.

कतारच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सातपैकी सहा जणांचे मृतदेह सापडले असून त्यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. उर्वरित एका बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी कतारची विशेष पथके समुद्रात अत्यंत सखोल आणि व्यापक शोधमोहीम राबवत आहेत. हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडली. पण गृह मंत्रालयाने या तांत्रिक बिघाडाचा तपशील उघड केलेला नाही. तसेच मृतांमध्ये कोणत्या देशाचे नागरिक होते तसेच त्यात सनदी अथवा लष्करी अधिकारी होते का? हेदेखील स्पष्ट करण्यात आलेले नाही.

logo
marathi.freepressjournal.in