Iran vs US-Israel War : चर्चेच्या दुसऱ्या फेरीत इराण सहभागी होणार

युनायटेड स्टेट्स आणि इराण दरम्यान सुरू असलेला तणाव निवळण्यासाठी आणि युद्धविरामावर चर्चा करण्यासाठी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची शुक्रवारी रात्री एका शिष्टमंडळासह पाकिस्तानात पोहोचणार आहेत.
चर्चेच्या दुसऱ्या फेरीत इराण सहभागी होणार
चर्चेच्या दुसऱ्या फेरीत इराण सहभागी होणार
Published on

इस्लामाबाद : युनायटेड स्टेट्स आणि इराण दरम्यान सुरू असलेला तणाव निवळण्यासाठी आणि युद्धविरामावर चर्चा करण्यासाठी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची शुक्रवारी रात्री एका शिष्टमंडळासह पाकिस्तानात पोहोचणार आहेत. या महत्त्वपूर्ण भेटीमुळे इस्लामाबादमध्ये शांतता चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ११ आणि १२ एप्रिल रोजी झालेली चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली होती, त्यामुळे आता होणाऱ्या या दुसऱ्या फेरीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

इराणी शिष्टमंडळाने चर्चेची रूपरेषा निश्चित केल्यानंतर, अमेरिकेचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ शनिवारी रात्रीपर्यंत पाकिस्तानात पोहोचण्याची शक्यता आहे. या दौऱ्यापूर्वी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी अरागची यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पाकिस्तानने या प्रकरणातील मध्यस्थ म्हणून बजावलेल्या भूमिकेचे इराणने कौतुक केले आहे.

चर्चेच्या दुसऱ्या फेरीत इराण सहभागी होणार
अमेरिका-इराण शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीवर अनिश्चिततेचे सावट; युद्धबंदीची मुदत आज संपणार; बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. 'इराणसोबत करार होईपर्यंत ओर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद राहील', असे त्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. तसेच, अमेरिकेचे युद्ध सचिव पीट हेगसेथ यांनी इराणच्या हालचालींवर लष्करी कारवाई करण्याची धमकी दिली आहे. सध्या मध्य पूर्व भागात अमेरिकेच्या तीन विमानवाहू युद्धनौका तैनात आहेत. ११ आणि १२ एप्रिल रोजी झालेली चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली होती, त्यामुळे आता होणाऱ्या या दुसऱ्या फेरीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

भारतीय खलाशी सुरक्षित

इराणने ताब्यात घेतलेल्या जहाजावरील भारतीय खलाशी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, हे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतील धोक्याच्या छायेतून बाहेर काढून पूर्व दिशेला असलेल्या तुलनेने सुरक्षित क्षेत्रात नेण्यात आले आहे. अमेरिकेने इराणी बंदरांवर घातलेली नाकेबंदी आणि इराणची जहाजे जप्त केल्याच्या रागातून, इराणने २२ एप्रिल रोजी सामुद्रधुनीतून बाहेर पडणाऱ्या दोन परदेशी मालवाहू जहाजांवर ताबा मिळवला होता, तर तिसऱ्या जहाजावर गोळीबार केला होता. इराणच्या निमलष्करी दलाने 'फ्रान्सेस्का' आणि 'एपामिनोंडास' या दोन कंटेनर जहाजांना आपल्या ताब्यात घेतले आहे. एपामिनोंडास या जहाजावर एकूण २१ कर्मचारी असून त्यात युक्रेनियन आणि फिलिपिनो नागरिकांचा समावेश आहे. या जहाजावर एक भारतीय खलाशी असून तो भारतात येत होता. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या खलाशाशी संपर्क झाला असून तो सुखरूप आहे.

logo
marathi.freepressjournal.in