

मुंबई : इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्य-पूर्व व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून, परदेशात वास्तव्यास असलेल्या व अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने अत्यावश्यक सूचना जारी केल्या असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार खात्याने, तसेच विविध भारतीय दूतावासांनी २४×७ आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित केले असून, राज्य शासन या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे, तसेच दूतावासाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन व भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय हे संयुक्तपणे परदेशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चोवीस तास कार्यरत आहे. आवश्यक मदत, माहिती समन्वय तसेच परिस्थितीनुसार स्थलांतराची (इव्हॅक्युएशन) तयारी सुरू असल्याचे आपत्कालीन कार्य केंद्राचे उपसचिव दत्तात्रय कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र (एसईओसी) २४×७ सुरू
परदेशात अडकलेल्या नागरिकांबाबत माहिती देण्यासाठी अथवा आपत्कालीन मदतीसाठी राज्य आत्पकालीन कार्य केंद्र २४×७ सुरू राहणार आहे. नागरिकांनी फोन १०७७ (टोल फ्री) फोन +९१-९३२१५८७१४३ दूरध्वनी: ०२२-२२०२७९९० ई-मेल : controlroom@gov.in यावर संपर्क साधावा.
सुरक्षा मार्गदर्शक सूचना, सल्ल्यांचे पालन करण्याचा सल्ला
इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर, संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील सर्व भारतीय नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचा, आवश्यक ती काळजी घेण्याचा, सतर्क राहण्याचा तसेच यूएईच्या अधिकाऱ्यांकडून आणि दूतावासाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सुरक्षा मार्गदर्शक सूचना व सल्ल्यांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अबू धाबी
अबू धाबी येथील भारतीय दूतावास आणि दुबई येथील वाणिज्य दूतावास कार्यरत असून कोणत्याही आपत्कालीन चौकशीसाठी यूएईमधील भारतीय नागरिकांसाठी संपर्क : टोल-फ्री क्रमांक: 800-46342, व्हॉट्सॲॅप: +971543090571, ईमेल: pbsk.dubai@mea.gov.in आणि ca.abudhabi@mea.gov.in
तेल अवीव
सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इस्रायलमधील सर्व भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि सर्व वेळ सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इस्रायलमधील भारतीय नागरिकांनी इस्रायली अधिकाऱ्यांकडून आणि होम फ्रंट कमांडकडून जारी करण्यात आलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असा सल्ला देण्यात आला असून अद्ययावत सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत : https://www.oref.org.il/eng.
भारतीय नागरिकांनी नियुक्त आश्रयस्थळांच्या जवळ राहावे, निवासस्थान किंवा कार्यस्थळाजवळील संरक्षित जागांची माहिती करून घ्यावी. पुढील सूचना मिळेपर्यंत इस्रायलमधील सर्व अनावश्यक व गैरआवश्यक प्रवास टाळावा, असा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांनी स्थानिक बातम्या, अधिकृत घोषणा आणि आपत्कालीन इशारे यांचे नियमितपणे निरीक्षण करावे. आपत्कालीन परिस्थितीत भारतीय नागरिकांसाठी तेल अवीव येथील भारतीय दूतावासाकरिता २४x७ हेल्पलाइन संपर्क : दूरध्वनी: +972-54-7520711; +972-54-2428378, ई-मेल: cons1.telaviv@mea.gov.in
दोहा
कतारमधील सर्व भारतीय नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचा तसेच दूतावास आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या बातम्या व सल्ल्यांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला असून दूतावास नेहमीप्रमाणे कार्यरत आहे. दूतावासाचा २४x७ हेल्पलाइन क्रमांक: 00974-55647502 असून, कोणत्याही चौकशीसाठी ईमेल: cons.doha@mea.gov.in वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या आपत्कालीन सूचनेनुसार, सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांनी लष्करी स्थळांच्या परिसरापासून दूर राहावे आणि घरात किंवा इतर कोणत्याही इमारतीत सुरक्षित राहावे. अत्यंत आवश्यक असल्याशिवाय बाहेर पडू नये किंवा हालचाल करू नये, जेणेकरून कोणत्याही जोखमीपासून बचाव होईल. पॅलेस्टाइनमधील सर्व भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याची तसेच स्थानिक प्रशासनाकडून सूचित करण्यात आलेल्या सुरक्षा व आपत्कालीन प्रक्रियांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत क्रमांक व ईमेल संपर्क : दूरध्वनी : +970592916418, ईमेल : repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in
तेहरान
इराणमधील सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा, अनावश्यक हालचाली टाळण्याचा आणि शक्य तितक्या घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय नागरिकांनी बातम्यांवर लक्ष ठेवावे, परिस्थितीबाबत जागरूक रहावे. भारतीय दूतावासाकडून येणाऱ्या पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी. दूतावासाचे आपत्कालीन संपर्क तपशील : +989128109115 +989128109109
रियाध
सौदी अरेबियात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा, प्रचलित सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा, स्थानिक प्रशासन, दूतावासाकडून जारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रियाध येथील भारतीय दूतावास आणि जेद्दा येथील वाणिज्य दूतावास कार्यरत आहेत आणि आवश्यकतेनुसार पुढील जाती माहिती व सल्ले जारी करतील. रियाध येथील भारतीय दूतावासाचे आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक : 00-966-11-4884697, 00-966-542126748 (फक्त व्हॉट्सॲप), 800 247 1234 (टोल-फ्री), ईमेल: cw.riyadh@mea.gov.in असे आहेत.
धैर्य गजरा / मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) परिसरातील वातावरण रविवारी सकाळपासूनच चिंतापूर्ण शांततेत होते. उड्डाण माहितीस्थळी प्रवासी हे बोर्डांवर नजरा खिळवून होते.
सलग दुसऱ्या दिवशी मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे भारताचे पश्चिमेकडील हवाई कॉरिडॉर ठप्प आहेत. आखातातील हवाई मार्ग बंद केल्यानंतर भारतीय विमानतळांवरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या ८५४ उड्डाणे रद्द करण्यात आली. लेव्हल P10 वरील निर्गमन गेट्सच्या बाहेर, नऊ तरुण खेळाडूंचा एक गट स्तब्ध शांततेत उभा होता. देशाच्या विविध भागांतून मुंबईत आलेले हे तरुण खेळाडू रविवारी सकाळी युरोपियन आइस स्टॉक चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी म्युनिकला जाणार होते, परंतु त्यांचे स्वागत 'रद्द' दर्जा देऊन करण्यात आले. अबू धाबी मार्गे म्युनिकला जाणारी कनेक्टिंग फ्लाइट एतिहाद एअरवेज चालवत होती - जी अबू धाबी येथे स्थित आहे - तणावाच्या काळात मध्य पूर्वेतील सर्वात जास्त प्रभावित विमानतळांपैकी एक आहे.