पाक लष्कराचा स्वतःच्याच नागरिकांवर हवाई हल्ला; खैबर पख्तूनख्वात ३० जणांचा बळी

खैबर पख्तूनख्वा (केपी) प्रांतात पाकिस्तानी लष्कराने रविवारी (दि.२१) रात्री जोरदार हवाई हल्ला चढवला. खैबर जिल्ह्यातील तिरह भागात झालेल्या या बॉम्बहल्ल्यात किमान ३० जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.
पाक लष्कराचा स्वतःच्याच नागरिकांवर हवाई हल्ला; खैबर पख्तूनख्वात ३० जणांचा बळी
Published on

खैबर पख्तूनख्वा (केपी) प्रांतात पाकिस्तानी लष्कराने रविवारी (दि.२१) रात्री जोरदार हवाई हल्ला चढवला. खैबर जिल्ह्यातील तिरह भागात झालेल्या या बॉम्बहल्ल्यात किमान ३० जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. याशिवाय ३५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तथापि, पाकिस्तानी लष्कर आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून अद्याप या हल्ल्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

हल्ल्यात गाव उद्ध्वस्त

न्यूज १८ च्या वृत्तानुसार, मात्रे दारा गाव सर्वाधिक प्रभावित झाले आहे. पहाटे दोनच्या सुमारास पाकिस्तानी हवाई दलाने JF-१७ लढाऊ विमानांतून किमान सहा LS-६ बॉम्ब टाकले. या स्फोटांमुळे अनेक घरे कोसळली आणि झोपेत असलेले नागरिक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. हल्ल्यानंतर दहा तासांनंतरही मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून स्थानिक आणि बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.\

मृतदेह दफन करण्यास नकार

या हल्ल्याविरोधात खैबर चौकात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तिरह परिसरातील अकाखेल समाजाने पीडित महिलांचे मृतदेह गावात दफन करण्याचा निर्णय घेतला असला, तरी पुरुष आणि मुलांचे मृतदेह कॉर्प्स कमांडर हाऊससमोर ठेवले जातील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in