भीषण उष्णतेमुळे तडफडून ४९ प्रवाशांचा मृत्यू; सहारा वाळवंटातील भीषण घटना

पश्चिम आफ्रिकेत सहारा वाळवंटात प्रवाशांनी भरलेला ट्रक अचानक बिघडला आणि भीषण उष्णता आणि पाण्याच्या अभावापोटी ट्रकमधील तब्बल ४९ लोकांचा तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे सर्व जण एका मुस्लिम सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन माली देशातून परतत होते.
भीषण उष्णतेमुळे तडफडून ४९ प्रवाशांचा मृत्यू; सहारा वाळवंटातील भीषण घटना
भीषण उष्णतेमुळे तडफडून ४९ प्रवाशांचा मृत्यू; सहारा वाळवंटातील भीषण घटनाPhoto : X
Published on

नायजर : पश्चिम आफ्रिकेत सहारा वाळवंटात प्रवाशांनी भरलेला ट्रक अचानक बिघडला आणि भीषण उष्णता आणि पाण्याच्या अभावापोटी ट्रकमधील तब्बल ४९ लोकांचा तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे सर्व जण एका मुस्लिम सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन माली देशातून परतत होते.

या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेत २ प्रवासी सुदैवाने जिवंत वाचले आहेत. या दोघांनी या रणरणत्या उन्हात, जीवाची पर्वा न करता तब्बल ५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पायी कापले. वाळवंटातून वाट काढत अखेर ते एका पाण्याच्या स्त्रोतापाशी पोहोचले आणि तिथून त्यांनी अस्सामाकाचा रस्ता धरला. या दोन वाचलेल्या प्रवाशांनीच प्रशासनाला ट्रक खराब झाल्याची आणि तिथे लोक अडकल्याची माहिती दिली. दरम्यान, हा संपूर्ण परिसर स्थलांतरित लोकांच्या येण्या-जाण्याचा मार्ग म्हणून ओळखला जातो. यापूर्वीही या अत्यंत कठीण आणि धोकादायक वाळवंटी मार्गावर अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हे सर्व प्रवासी अस्सामाका या ठिकाणाहून साधारण ८० किलोमीटर दूर असलेल्या एका दुर्गम भागात अडकले होते. अस्सामाका हा नायजर आणि अल्जीरिया दरम्यानचा क्रॉसिंग पॉईंट असून तो माली देशाच्या सीमेजवळ आहे.

प्रवासादरम्यान अचानक ट्रक नादुरुस्त झाला. ड्रायव्हर, त्याचे मदतनीस आणि प्रवाशांनी ट्रक दुरुस्त करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. दरम्यान, गाडीतील पिण्याचे पाणी पूर्णपणे संपले होते. सभोवताली फक्त तापलेली वाळू, अंगाची लाहीलाही करणारी भीषण उष्णता आणि अन्न-पाण्याची कोणतीही सोय नसलेल्या अत्यंत धोकादायक भागात हे सर्वजण अडकले. अखेर तीव्र तहान आणि उष्णतेमुळे या सर्वांचा जागीच तडफडून मृत्यू झाला. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मृत पावलेल्या सर्व दुर्दैवी प्रवाशांना सामूहिक दफनभूमीत दफन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in