ब्रिटनमध्ये मुलांसाठी सोशल मीडिया बंदी

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी देशातील १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा केली आहे. या नव्या नियमांतर्गत मुलांच्या सोशल मीडिया वापरासोबतच गेमिंग आणि लाइव्ह स्ट्रीमिंग सेवांवरही कठोर निर्बंध लादले जाणार आहेत.
ब्रिटनमध्ये मुलांसाठी सोशल मीडिया बंदी
ब्रिटनमध्ये मुलांसाठी सोशल मीडिया बंदी
Published on

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी देशातील १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा केली आहे. या नव्या नियमांतर्गत मुलांच्या सोशल मीडिया वापरासोबतच गेमिंग आणि लाइव्ह स्ट्रीमिंग सेवांवरही कठोर निर्बंध लादले जाणार आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे स्टार्मर यांनी स्पष्ट केले.

मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा ब्रिटन हा पहिला देश नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर कायदेशीर बंदी लागू केली आहे. कॅनडा, ब्राझील आणि इंडोनेशिया या देशांनीही वयोमर्यादेवर आधारित निर्बंध लागू केले आहेत, तर फ्रान्स, स्पेन, आणि दक्षिण कोरिया यांसारखे देशही अशाच प्रकारच्या नियमांचा विचार करत आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांनी त्यांच्या या प्रस्तावाला जागतिक स्तरावर ‘अग्रगण्य पाऊल’ म्हटले असून, ब्रिटनचे नियम ऑस्ट्रेलियाच्या नियमांपेक्षाही अधिक कडक असू शकतात, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in