
वॉशिंग्टन : अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या जगभरातील नागरिकांवर अमेरिकन सैन्याने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरितांच्या निर्णयावर स्वाक्षरी केल्यावर फक्त ११ दिवसांतच २५ हजारांहून अधिक अवैध स्थलांतरितांना अटक करण्यात आली होती. आता अमेरिकेच्या लष्कराचे सी-१७ हे विमान २०५ भारतीय स्थलांतरितांना घेऊन भारताकडे रवाना झाले आहे, अशी माहिती एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिली. या प्रवाशांना घेऊन विमानाने भारताच्या दिशेने उड्डाणदेखील केले आहे.
२४ तासांच्या आत हे विमान अमृतसरला पोहोचणार आहे. भारताने अवैध स्थलांतरितांना परत घेण्याबाबत आधीच सहमती दर्शवली होती. जवळपास १८ हजार अवैध भारतीय स्थलांतरितांना परत भारतात आणणार असल्याचे सांगण्यात आले होते. या लोकांनी बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत प्रवेश केला होता.