Video : व्हाइट हाऊसने केला स्थलांतरितांचा व्हिडिओ पोस्ट; लोकांना साखळ्यांनी बांधून विमानात बसवले

पाकिस्तानस्थित गुप्तचरांना संवेदनक्षम माहिती फुरविल्याच्या आरोपाखाली तीन जणांना अटक करण्यात आल्याचे बुधवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सांगण्यात आले.
Video : व्हाइट हाऊसने केला स्थलांतरितांचा व्हिडिओ पोस्ट; लोकांना साखळ्यांनी बांधून विमानात बसवले
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसने मंगळवारी ‘एक्स’वर एक व्हिडिओ पोस्ट केला. या ४१ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांना कशा प्रकारे साखळ्यांनी बांधून विमानात चढवले गेले हे दाखवण्यात आले आहे.

व्हिडिओमध्ये विमानतळ सुरक्षारक्षक एकेकाला हातकड्या आणि बेड्या घालताना दिसत आहेत. लोक येतात आणि त्यांना हात, पाय आणि कंबरेभोवती बेड्या आणि साखळ्यांनी बांधले जाते. व्हिडिओच्या शेवटी, लोक विमानात चढताना दाखवले आहेत. व्हाईट हाऊसने या व्हिडिओला ‘एएसएमआर : बेकायदेशीर एलियन डिपोर्टेशन फ्लाइट’ असे कॅप्शन दिले आहे. हे कॅप्शन अमेरिकेतून हाकलून लावलेल्या लोकांची चेष्टा करणारे आहे.

अलिकडेच अमेरिकेने तीन लष्करी विमानांमधून ३३२ भारतीयांना परत पाठवले. पहिले विमान ५ फेब्रुवारी रोजी उतरले. सर्व लोकांना हातकड्या, बेड्या आणि साखळ्या घालून येथे आणण्यात आले. यावरून देशात एकच गोंधळ उडाला. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, लोकांशी असे वागले जाणार नाही याची खात्री ते करतील. मात्र, या स्थितीत अद्याप फारसा बदल झालेला नाही.

logo
marathi.freepressjournal.in