पाकिस्तानी जनता भारतापेक्षा जास्त आनंदी; फिनलंड जगातील सर्वात आनंदी देश, युद्धग्रस्त इस्रायल ८ व्या स्थानावर, ‘वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट’मधील माहिती
(Photo-@knowledge.wharton)

पाकिस्तानी जनता भारतापेक्षा जास्त आनंदी; फिनलंड जगातील सर्वात आनंदी देश, युद्धग्रस्त इस्रायल ८ व्या स्थानावर, ‘वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट’मधील माहिती

संयुक्त राष्ट्राने बुधवारी ‘वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट २०२६’ जारी केला असून त्यामध्ये सलग नवव्यांदा फिनलंडला जगातील सर्वात आनंदी देश घोषित करण्यात आले आहे.
Published on

हेलसिंकी : संयुक्त राष्ट्राने बुधवारी ‘वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट २०२६’ जारी केला असून त्यामध्ये सलग नवव्यांदा फिनलंडला जगातील सर्वात आनंदी देश घोषित करण्यात आले आहे. १४७ देशांच्या यादीत पाकिस्तान १०४ व्या क्रमांकावर आहे, तर भारत ११६ व्या स्थानावर आहे. २०२५ मध्ये भारताची रँकिंग ११८वी होती, तर अडीच वर्षांपासून युद्धात अडकलेल्या इस्रायलला जगातील आठवा सर्वात आनंदी देश घोषित करण्यात आले आहे.

यादीत सर्वात खाली संघर्षग्रस्त देश आहेत, त्यामध्ये अफगाणिस्तान पुन्हा सर्वात कमी आनंदी देश ठरला, त्याच्या वर सिएरा लिओन आणि मलावी आहेत. यावेळीही कोणताही इंग्रजी बोलणारा देश टॉप १० मध्ये नाही. अमेरिका २३व्या, कॅनडा २५व्या आणि ब्रिटन २९व्या स्थानावर आहेत.

आनंदाचे कारण

फिनलंडसारख्या देशांच्या आनंदाचे कारण चांगली आर्थिक स्थिती, संसाधनांचे समान वाटप, मजबूत कल्याणकारी व्यवस्था आणि उत्तम जीवनमान आहे. अहवालानुसार, जास्त सोशल मीडियाच्या वापरामुळे अनेक देशांतील तरुणांच्या आनंद आणि मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होत आहे.

टॉप १० देश

फिनलंड, आइसलँड, डेन्मार्क, कोस्टा रिका, स्वीडन, नॉर्वे, नेदरलँड्स, इस्रायल, लक्झेंबर्ग आणि स्वित्झर्लंड.

logo
marathi.freepressjournal.in