Ambedkar Jayanti 2026: पांढऱ्या साडीतील परफेक्ट लूक! महिलांसाठी खास फॅशन टिप्स

विशेषतः पांढऱ्या साडीला निळ्या बॉर्डरची डिझाईन असेल तर ती अधिक आकर्षक दिसते. सध्या बाजारात आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारच्या अनेक साड्या उपलब्ध असतात.
Ambedkar Jayanti 2026: पांढऱ्या साडीतील  परफेक्ट लूक! महिलांसाठी खास फॅशन टिप्स
Ambedkar Jayanti 2026: पांढऱ्या साडीतील परफेक्ट लूक! महिलांसाठी खास फॅशन टिप्स
Published on

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या (१४ एप्रिल) निमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण असते. या दिवशी अनेक महिला पारंपरिक आणि आकर्षक पद्धतीने तयार होत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात. पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या वस्त्रांना या दिवशी खास महत्त्व असते. त्यामुळे सोप्या फॅशन टिप्स फॉलो करून जयंतीसाठी स्टायलिश लूक कसा करायचा, ते जाणून घ्या.

पांढरी साडी - पारंपरिक आणि एलिगंट लूक

आंबेडकर जयंतीसाठी पांढरी साडी हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. जयंतीसाठी साधी कॉटन, सिल्क किंवा चंदेरी साडी निवडू शकता. विशेषतः पांढऱ्या साडीला निळ्या बॉर्डरची डिझाईन असेल तर ती अधिक आकर्षक दिसते. सध्या बाजारात आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारच्या अनेक साड्या उपलब्ध असतात.

निळ्या रंगाची ॲक्सेसरीज

पांढऱ्या साडीवर निळ्या रंगाच्या बांगड्या, इअररिंग्स किंवा नेकपीस वापरल्यास लूक अधिक उठून दिसतो. सध्या प्रचलित असलेल्या काश्मिरी बांगड्याही पांढऱ्या साडीवर उठून दिसतील.

ब्लाउजची निवड

पांढऱ्या साडीवर रॉयल ब्लू किंवा नेव्ही ब्लू ब्लाउज शोभून दिसेल. साधा स्लीव्हलेस, एल्बो लेंथ किंवा बोट नेक डिझाईन निवडल्यास क्लासी लूक मिळतो.

मेकअप आणि हेअरस्टाईल

पांढऱ्या साडीवर निळ्या रंगाची ज्वेलरी आणि हलका मेकअप केल्याने लूक परफेक्ट दिसेल. केसांमध्ये साधा बन किंवा वेणी हा पारंपरिक पर्याय निवडू शकता. त्यावर गजरा लावल्यास लूक अजून आकर्षक दिसेल. जर मिसरवणुकीसाठी सहभागी होणार असाल तर हेव्ही मेकअपही शोभून दिसेल पण यासाठी योग्य मेकअप प्रोडक्ट वापरणे आवश्यक आहे.

फुटवेअर आणि बॅग

साडीवर सँडल्स किंवा कोल्हापुरी चप्पल यांचा वापर करा सोबत क्लच किंवा स्लिंग बॅग घेतल्यास लूक पूर्ण होईल.

(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in