

तुम्हाला ठाऊक आहे का? आपल्या स्वयंपाकघरातच एक असं सुपरफुड आहे, जे औषधांपेक्षा कमी नाही.. होय, तो म्हणजे ‘आवळा’. आयुर्वेदात आवळ्याला अमृतसमान मानलं गेलं आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा ज्युस घेतल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल होतात. फक्त १५ दिवस हा साधा उपाय केल्यास त्वचा, केस, पचन आणि दृष्टीवर आश्चर्यकारक परिणाम दिसून येतो.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन Cचं प्रमाण संत्र्यांपेक्षा २० पट जास्त असतं. त्यासोबतच अँटी-ऑक्सिडंट्स, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, लोह आणि फ्लेव्होनॉइड्स यांसारखे घटक शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवतात. त्यामुळे तो रोगप्रतिकारक कवचासारखा काम करतो.
डोळ्यांसाठी वरदान
कंप्युटरसमोर दीर्घकाळ काम करणाऱ्यांसाठी आवळ्याचे सरबत म्हणजे नैसर्गिक टॉनिक! यातील कॅरोटिन गुणधर्मामुळे दृष्टी सुधारते आणि डोळ्यांतील थकवा कमी होतो. नियमित सेवनाने चष्म्याची नंबर वाढण्याची शक्यता कमी होते, असं तज्ज्ञ सांगतात.
वजन कमी करण्यास मदत
सलग १५ दिवस आवळा सरबत प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रिया (metabolism) सुधारते. त्यामुळे चरबी जलद गतीने वितळते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास आवळा सरबत पिणे वजन कमी करण्याच्या प्रवासात मोठा फरक आणू शकते.
केसांसाठी नैसर्गिक टॉनिक
आवळ्यातील व्हिटॅमिन C आणि अँटी-ऑक्सिडंट्स केसांच्या मुळांना बळकट करतात. केसगळती, कोंडा आणि अकाली पांढरे होणे या समस्यांवर आवळा प्रभावी मानला जातो. म्हणूनच आजही अनेक केसांसाठीच्या तेलांमध्ये आवळा मुख्य घटक असतो.
पचन सुधारण्यासाठी रामबाण उपाय
बद्धकोष्ठता, अॅसिडिटी किंवा गॅस, या सर्व पोटाशी संबंधित समस्यांसाठी आवळ्याचे सरबत हा सोपा उपाय आहे. तो आतड्यांची हालचाल सुधारतो आणि पचनसंस्था स्वच्छ ठेवतो.
काही ताजे आवळे पाण्याने स्वच्छ धुवा
छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये पाणी घालून वाटा
हव्यास असल्यास थोडं मध घालू शकता
गाळून किंवा न गाळताही पिणं आरोग्यासाठी उपयोगी
एक छोटी सूचना
अति प्रमाणात आवळा सेवन केल्यास पोटात त्रास, अॅसिडिटी किंवा अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे दिवसातून एकदाच आणि माफक प्रमाणात घेणं उत्तम.
आवळा सरबत हे शरीरासाठी एक नैसर्गिक ‘डिटॉक्स ड्रिंक’ आहे. जे डोळ्यांपासून केसांपर्यंत आणि पचनापासून प्रतिकारशक्तीपर्यंत सर्व काही सुधारते. फक्त १५ दिवस हे सवयीत आणा आणि बदल स्वतः अनुभवा.