दूध आणि केळ्याचा शेक तुम्हीही आवडीने पिता का? चविष्ट लागतो, पटकन पोट भरतं म्हणून दूध आणि केळं ह्याला आपण ‘सुपरहेल्दी’ कॉम्बो मानत आलोय. पण काय दूध आणि केळ्याचे एकत्र सेवन करणं, खरोखर शरीरासाठी योग्य आहे? आयुर्वेदानुसार काही अन्नपदार्थ एकत्र घेणं टाळावं लागतं आणि दूध व केळी हे त्यातलेच एक कॉम्बिनेशन असल्याचं आहारतज्ज्ञांचं म्हणणं आहे.
@snehyoga_official या इंस्टाग्राम पेजवर आहारतज्ज्ञ स्नेहल नेहमीच काय खावं, काय टाळावं आणि आरोग्यासाठी काय योग्य आहे, याबद्दल माहिती देतात. अलीकडेच त्यांनी दूध आणि केळी यांचे एकत्र सेवन करावे का? या विषयावर माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या म्हणतात, "दूध आणि केळी एकत्र खाल्ली नाही पाहिजे. कारण हे दोन्ही परस्परविरोधी गुणधर्म असलेले पदार्थ आहे. यांचे एकत्र सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नसते.
यामुळे काय होतं?
"आयुर्वेदानुसार दूध हे थंड असून केळी उष्ण असते. या दोन विरुद्ध गुणधर्माच्या पदार्थांचे एकत्र सेवन केल्यास शरीरात ‘आम्ल’ म्हणजेच टॉक्सिन्स तयार होतात. त्यामुळे पचनक्रियेवर ताण येतो. परिणामी आपल्याला अपचन, गॅसेस, ब्लोटिंग यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच हे कफ होण्याचे सुद्धा एक कारण आहे. यामुळेच दूध आणि केळी एकत्रित खाणं टाळा."
(Disclaimer: ही माहिती स्नेहल यांच्या इंस्टाग्रामवरील व्हिडिओवर आधारित आहे. यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)