PCOS मुळे त्रास होतोय? अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितला ज्येष्ठमधाचा सोपा उपाय; असा बनवा हर्बल चहा

पीसीओएसमुळे अनियमित पाळी, हार्मोनल असंतुलन आणि वजनवाढीचा त्रास होतोय? अभिनेत्री भाग्यश्रीने जेष्ठमधाच्या चहाचा सोपा उपाय सांगितला आहे. जाणून घ्या हा चहा कसा बनवायचा आणि त्याचे फायदे.
PCOS मुळे त्रास होतोय? अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितला ज्येष्ठमधाचा सोपा उपाय; असा बनवा हर्बल चहा
PCOS मुळे त्रास होतोय? अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितला ज्येष्ठमधाचा सोपा उपाय; असा बनवा हर्बल चहा
Published on

अभिनेत्री भाग्यश्री अलीकडे चित्रपटांपेक्षा तिच्या फिटनेस आणि आरोग्यविषयक टिप्समुळे अधिक चर्चेत असते. सोशल मीडियावर ती नियमितपणे आरोग्यदायी सवयी, घरगुती उपाय आणि फिटनेसविषयी माहिती शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या पीसीओएस (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) समस्येसाठी ज्येष्ठमधाच्या चहाचा एक सोपा उपाय सांगितला आहे.

पीसीओएसमध्ये ज्येष्ठमध कसा ठरू शकतो फायदेशीर?

भाग्यश्रीच्या मते, ज्येष्ठमधामध्ये असे काही नैसर्गिक घटक असतात जे शरीरातील अँड्रोजन हार्मोन्सचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात. पीसीओएसमध्ये हार्मोन्सचे असंतुलन हे प्रमुख कारण मानले जाते. त्यामुळे अनियमित मासिक पाळी, चेहऱ्यावर नको असलेले केस, त्वचेच्या समस्या आणि इतर त्रास कमी करण्यासाठी ज्येष्ठमधाचा उपयोग होऊ शकतो.

ज्येष्ठमधाचा चहा कसा तयार करायचा?

यासाठी ज्येष्ठमधाच्या मुळाचा एक छोटा तुकडा घ्या. एक कप पाण्यात तो टाकून ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर उकळवा. त्यानंतर पाणी गाळून कोमट असतानाच प्या. हा चहा नियमितपणे घेतल्यास शरीराला त्याचे फायदे मिळू शकतात.

पीसीओएस नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे?

पीसीओएसचा त्रास कमी करण्यासाठी केवळ घरगुती उपाय पुरेसे नसतात. आहार आणि जीवनशैलीतही बदल करणे आवश्यक असते. रोजच्या आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या, कडधान्ये, सुका मेवा आणि बियांचा समावेश करावा. तसेच नियमित व्यायाम, योग आणि पुरेशी झोप याकडेही लक्ष द्यावे.

वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत

पीसीओएस असलेल्या अनेक महिलांना वजन वाढण्याची समस्या जाणवते. ज्येष्ठमधामधील काही घटक शरीराचा चयापचय वेग सुधारण्यास मदत करू शकतात. काही अभ्यासांनुसार, पोटाभोवतीची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठीही ज्येष्ठमध उपयुक्त ठरू शकतो. मात्र यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायामाची जोड आवश्यक आहे.

PCOS मुळे त्रास होतोय? अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितला ज्येष्ठमधाचा सोपा उपाय; असा बनवा हर्बल चहा
मांड्या-पोटावरील चरबी कमी करायची? रोज सकाळी जिऱ्याचं पाणी पिण्याची सवय लावा

ज्येष्ठमधाचे इतर फायदे

  • घसा खवखवणे आणि खोकला कमी करण्यास मदत.

  • पचनक्रिया सुधारण्यास उपयोगी.

  • शरीरातील सूज कमी करण्यास मदत.

  • रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त.

  • थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यास मदत.

(Disclaimer : ज्येष्ठमधाचा चहा काहींना फायदेशीर ठरू शकतो, मात्र त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळा असू शकतो. PCOS किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असल्यास हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

logo
marathi.freepressjournal.in