Chandra Grahan 2025 : भारतात रक्तचंद्राचे अद्भुत दृश्य; कधी दिसणार? जाणून घ्या सुतक व वेधकाळ माहिती

भाद्रपद पौर्णिमेला म्हणजेच रविवार, ७ सप्टेंबर रोजी वर्षातील दुसरे आणि शेवटचे खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे.
Chandra Grahan 2025 : भारतात रक्तचंद्राचे अद्भुत दृश्य; कधी दिसणार? जाणून घ्या सुतक व वेधकाळ माहिती
Published on

भाद्रपद पौर्णिमेला म्हणजेच रविवार, ७ सप्टेंबर रोजी वर्षातील दुसरे आणि शेवटचे खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री ०९:५८ वाजता सुरू होऊन ८ सप्टेंबर पहाटे ०१:२६ वाजता समाप्त होईल. यावेळी आकाशात लालसर 'ब्लड मून'चे अद्भुत दृश्य दिसणार आहे.

चंद्रग्रहण म्हणजे काय?

पृथ्वी ही सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये आली, की तिची सावली चंद्रावर पडते. चंद्र पूर्णपणे सावलीत झाकला गेला की त्याला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. यावेळी चंद्र लाल-नारिंगी छटा घेतो, ज्याला 'ब्लड मून' असे म्हणतात.

हे ग्रहण कुठे दिसणार?

भारतभर हे ग्रहण दिसणार आहे. विशेषतः पुढील शहरांमध्ये ते सहज पाहता येईल -

उत्तर भारत : दिल्ली, चंदीगड, जयपूर, लखनऊ

पश्चिम भारत : मुंबई, पुणे, अहमदाबाद

दक्षिण भारत : चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, कोची

पूर्व भारत : कोलकाता, भुवनेश्वर, गुवाहाटी

मध्य भारत : नागपूर, भोपाळ, रायपूर

भारताबरोबरच हे ग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अमेरिका आणि समुद्रप्रदेशांतही दिसेल.

सुतक व वेधकाळ

  • चंद्रग्रहण असल्याने सुतक काळ लागू होतो.

  • सुतक ग्रहणाच्या ९ तास आधी सुरू होतो. त्यामुळे ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३७ पासून सुतक लागू होईल.

  • ग्रहण संपेपर्यंत म्हणजेच ८ सप्टेंबर पहाटे ०१:२६ पर्यंत सुतक राहील.

  • या काळात गर्भवती, बालक, वृद्ध, आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.

  • सायं ५:१५ नंतरपासून ग्रहणाचे वेध पाळले जातात.

ग्रहणकाळात काय करावे?

  • या काळात विशेषत: गर्भवती महिलांनी स्नान, मंत्रजप, दान, होम, तर्पण, श्राद्ध यासारखी धार्मिक कृत्ये करावीत.

  • ग्रहण संपल्यानंतर स्नान करून घर शुद्ध करून पूजा करावी.

काय करू नये?

  • ग्रहणकाळात भोजन, झोप, कामविषयक व्यवहार, तेल लावणे व अभ्यंग करू नयेत.

  • स्वयंपाकातील चिरणे, कापणे, तळणे अशी कामे करू नये.

  • या काळात घराबाहेर जाऊ नये.

  • अनिष्ट राशीतील व्यक्तींनी व गर्भवतींनी ग्रहण पाहणे टाळावे.

राशीफल परिणाम

शुभफल : मेष, वृषभ, कन्या, धनु

मिश्रफल : मिथुन, सिंह, तुला, मकर

अनिष्ट फल : कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन

logo
marathi.freepressjournal.in