Sunday Special : नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास; घरीच बनवा रेस्टॉरंटसारखं झणझणीत मटण, नोट करा रेसिपी

सुके खोबरे, तळलेला कांदा आणि मसाल्यांचा परफेक्ट मेळ यामुळे या मटणाला खास चव येते. ही रेसिपी घरी सहज बनवता येते आणि भाकरी, पोळी किंवा भातासोबत अप्रतिम लागते.
Sunday Special : नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास; घरीच बनवा रेस्टॉरंटसारखं झणझणीत मटण, नोट करा रेसिपी
(Photo-@sanjeevkapoor)
Published on

संडे स्पेशल म्हणून काहीतरी खास बनवायचं असेल, तर खोबऱ्याच्या मसाल्यातील झणझणीत मटण हा उत्तम पर्याय ठरू शकतो. सुके खोबरे, तळलेला कांदा आणि मसाल्यांचा परफेक्ट मेळ यामुळे या मटणाला खास चव येते. ही रेसिपी घरी सहज बनवता येते आणि भाकरी, पोळी किंवा भातासोबत अप्रतिम लागते.

Sunday Special : नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास; घरीच बनवा रेस्टॉरंटसारखं झणझणीत मटण, नोट करा रेसिपी
Sunday Special Recipe : फिश लव्हर्ससाठी खास! मालवणी स्टाईल सुरमई करी; ट्राय करा सोपी रेसिपी

साहित्य :

  • मटण (हाडांसह तुकडे) - १ किलो

  • सुके खोबरे (किसलेले) - १०० ग्रॅम

  • कांदे - ५ मध्यम

  • तेल - ३ टेबलस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • हळद - १/२ टीस्पून

  • आलं पेस्ट - १ टेबलस्पून

  • लसूण पेस्ट - १ टेबलस्पून

  • टोमॅटो (चिरलेले) - ४ मध्यम

  • सांकेश्वरी लाल तिखट - २ टीस्पून

  • वेलची पूड - १/२ टीस्पून

  • गरम मसाला - १ टीस्पून

Sunday Special : नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास; घरीच बनवा रेस्टॉरंटसारखं झणझणीत मटण, नोट करा रेसिपी
Sunday Special Recipe : घरीच बनवा मसालेदार स्टफ्ड पापलेट फ्राय; पाहुण्यांसाठी परफेक्ट डिश, वाचा रेसिपी

कृती :

सुरुवातीला सुके खोबरे हलक्या आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. कांद्याचा काही भाग कापून सोनेरी होईपर्यंत तळून घ्या आणि उरलेला बारीक चिरून ठेवा. तळलेला कांदा आणि भाजलेले खोबरे एकत्र करून थोडे पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा. मटणाला मीठ आणि हळद लावून प्रेशर कुकरमध्ये ३ ते ४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या.

Sunday Special : नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास; घरीच बनवा रेस्टॉरंटसारखं झणझणीत मटण, नोट करा रेसिपी
Sunday Special Recipe : अंड्यांना द्या हटके ट्विस्ट! नाश्त्याला बनवा 'चिली ऑइल एग्स'; झटपट रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

कढईत तेल गरम करून चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परता. त्यात आलं-लसूण पेस्ट घालून परता. नंतर टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. त्यात सांकेश्वरी लाल तिखट आणि तयार खोबऱ्याची पेस्ट घालून मसाला तेल सुटेपर्यंत परता. त्यानंतर शिजवलेले मटण घालून चांगले हलवा आणि १० मिनिटे शिजवा, जेणेकरून ग्रेव्ही घट्ट होईल. शेवटी वेलची पूड आणि गरम मसाला घालून गरमागरम सर्व्ह करा.

Sunday Special : नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास; घरीच बनवा रेस्टॉरंटसारखं झणझणीत मटण, नोट करा रेसिपी
Sunday Special Recipe : फिश लव्हर्ससाठी खास! मालवणी स्टाईल सुरमई करी; ट्राय करा सोपी रेसिपी

टिप्स :

  • मसाला मंद आचेवर परतल्यास चव अधिक खुलते.

  • मटण आधी शिजवून घेतल्याने वेळ वाचतो.

  • खोबऱ्याची पेस्ट बारीक केल्यास ग्रेव्ही स्मूद होते.

  • तिखट आपल्या चवीनुसार कमी-जास्त करा.

logo
marathi.freepressjournal.in