गायीचे-म्हशीचे-शेळीचे...कोणाच्या दुधाचे आरोग्यासाठी काय फायदे? जाणून घ्या फरक आणि बारकावे

गाय-म्हैस-शेळी हे तिन्ही दूध देणारे प्राणी आहे. तिघांचा आहार वेगळा असतो. त्याप्रमाणे त्यांच्या दुधातील पोषणतत्वे आणि त्यांचे गुणधर्म वेगळे असतात. तिन्ही प्राण्यांचे दूध मानवासाठी वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारे उपयुक्त असतात. तर इथे जाणून घेऊया कोणाच्या दुधाचे आरोग्याला काय फायदे होतात.
गायीचे-म्हशीचे-शेळीचे...कोणाच्या दुधाचे आरोग्यासाठी काय फायदे? जाणून घ्या फरक आणि बारकावे
Canva
Published on

आहारशास्त्रात दुधाला अतिशय पौष्टिक मानलय. दूध पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. अनेक वेळा फक्त गायीचेच दूध चांगले, म्हशीचे दूध कमी चांगले किंवा शेळीचे दूध आरोग्यदायी असे सांगितले जाते. मात्र लक्षात घ्या, गाय-म्हैस-शेळी हे तिन्ही दूध देणारे प्राणी आहे. तिघांचा आहार वेगळा असतो. त्याप्रमाणे त्यांच्या दुधातील पोषणतत्वे आणि त्यांचे गुणधर्म वेगळे असतात. तिन्ही प्राण्यांचे दूध मानवासाठी वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारे उपयुक्त असतात. तर इथे जाणून घेऊया कोणाच्या दुधाचे आरोग्याला काय फायदे होतात.

गायीचे दूध बुद्धीवर्धक

भारतीय परंपरेत गायीच्या दूधाला अमृत संबोधले आहे. विशेष करून भारतीय गायी ज्या विदेशी संकरित नाहीत त्यांचे दूध हे तान्ह्या बाळापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी आरोग्यदायी असते. प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, राइबोफ्लेविन, लैक्टोज, सॅच्युरेटेड फॅट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. गायीच्या दुधातून रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हाडे मजबूत होतात आणि त्वचा निरोगी राहते. गायीचे दूध पचायला हलके असते. त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

गायीचे दूध हे बुद्धीवर्धक असते. लहान मुलांची वाढ होत असताना विशेष करून वय वर्षे तीन ते वय वर्षे १२ या काळात नित्य नियमाने गायीचे दूध दिल्यास बुद्धीतल्लख होते, असे गौविज्ञान सांगते. गायीच्या दुधापासून तयार केलेले दही, ताक हे देखील उत्तम असते.

बलवर्धक म्हशीचे दूध

म्हशीचे दूध हे आरोग्याला अत्यंत फायदेशीर असते. संपूर्ण जगात गायीनंतर म्हशीचे दूध पिण्याचे प्रमाण जास्त असते. म्हशीचे दूध गायीच्या दुधापेक्षा अधिक घट्ट असते. तसेच त्यामध्ये स्निग्धता जास्त असल्याने त्वचेचे उत्तम पोषण होते.

म्हशीच्या दुधात प्रथिने, व्हिटॅमिन ए, सी, बी६, बी १२, फोलेट, पोटॅशियम, तांबे, कॅल्शियम, सोडियम, मँगनीज, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, जस्त इत्यादी घटक असतात. यातून शरीराला भरपूर पोषण मिळते. व्हिटामिन्सच्या उणिवा भरून निघते. विशेष करून व्हिटामीन बी १२ ची पूर्तता मिळते. हे व्हिटामिन शरीराची हाडे मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे तुम्हाला सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा आणखी काही आजार असल्यास म्हशीचे दूध पिणे उत्तम असते.

तुम्हाला अंगमेहनतीची कामे करावयाची असल्यास शरीर बळकट असणे आवश्यक असते. अशा वेळी म्हशीचे दूध नित्यनियमाने सेवन केल्यास शरीर बळकट होते.

हे ही वाचा:

गायीचे-म्हशीचे-शेळीचे...कोणाच्या दुधाचे आरोग्यासाठी काय फायदे? जाणून घ्या फरक आणि बारकावे
रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यावे की पिऊ नये? जाणून घ्या आयुर्वेद काय सांगते आणि काय आहेत फायदे-तोटे?

म्हशीचे दूध कोणी टाळावे?

म्हशीच्या दुधात स्निग्धता जास्त असल्याने लठ्ठपणा निर्माण होण्याची शक्यता असते. ज्यांचे वजन खूप जास्त आहे. ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांनी म्हशीचे दूध शक्यतो टाळावे. अशा वेळी गायीच्या दुधाचे सेवन करावे, जेणेकरून पौष्टिकताही मिळेल आणि वजनही नियंत्रणात राहील.

शेळीचे दूध कोणी आणि कधी प्यावे, काय आहेत फायदे?

शेळीला गरिबाची गाय म्हटले जाते. शेळीचे दूध हे गायीच्या दुधाप्रमाणेच उत्तम असते. मात्र, शेळीचे दूध हे तान्ह्या बाळाला पाजू नये. सामान्यपणे मूल एक वर्षाचे झाल्यानंतर शेळीचे दूध पिण्यासाठी द्यावे. शेळीच्या दुधात लॅक्टोजचे प्रमाण गायीच्या दुधापेक्षा कमी असते. त्यामुळे ज्या लोकांना लॅक्टोजच्या समस्या असतात. त्यांच्यासाठी शेळीचे दूध उत्तम असते. शेळी ही मुख्यत्वे करून हिरवी पाने आणि कडब्या सारखे पदार्थ खाते. त्यामुळे शेळीच्या दुधात उत्तम पोषक तत्व असतात.

शेळीच्या दुधात व्हिटामिन ए, सी, आणि डी असते. याशिवाय थायमिन, नायसिन, पायरीडॉक्सिन, कोलीन देखील जास्त प्रमाणात असतात. तसेच कॅल्शिअम, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम ही खनिजेही गायीच्या दुधापेक्षा जास्त असतात. त्यामुळे शेळीचे दूध पचनासाठी उत्तम असते.

विविध त्वचाविकारांवर शेळीचे दूध सर्वोत्तम असते. हल्ली अनेक सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी जसे की साबण, फेस वॉश बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in