सकाळच्या नाश्त्याचे टेंशन विसरा! मुलांच्या आवडीचे व्हेज सँडविच फक्त १० मिनिटांत तयार

सकाळच्या नाश्त्यात रोजच्या पदार्थांना कंटाळलेल्या लहान मुलांसाठी काहीतरी चविष्ट आणि हेल्दी बनवायचंय? मग क्रिमी व्हेज सँडविच हा परफेक्ट पर्याय! पौष्टिक भाज्या, चीझ-मेयोची क्रिमी टेक्स्चर आणि टोस्टेड ब्रेडची अप्रतिम चव… असा हा स्नॅक मुलांसह मोठ्यांनाही नक्कीच आवडेल.
सकाळच्या नाश्त्याचे टेंशन विसरा! मुलांच्या आवडीचे व्हेज सँडविच फक्त १० मिनिटांत तयार
सकाळच्या नाश्त्याचे टेंशन विसरा! मुलांच्या आवडीचे व्हेज सँडविच फक्त १० मिनिटांत तयार
Published on

सकाळच्या नाश्त्यात रोजच्या पदार्थांना कंटाळलेल्या लहान मुलांसाठी काहीतरी चविष्ट आणि हेल्दी बनवायचंय? मग क्रिमी व्हेज सँडविच हा परफेक्ट पर्याय! पौष्टिक भाज्या, चीझ-मेयोची क्रिमी टेक्स्चर आणि टोस्टेड ब्रेडची अप्रतिम चव… असा हा स्नॅक मुलांसह मोठ्यांनाही नक्कीच आवडेल. सकाळच्या नाश्त्यात झटपट तयार होणारे हे सॅंडविच संपूर्ण दिवसाची सुरुवात नक्कीच आनंदी करेल!

साहित्य:

  • ब्रेड स्लाईस

  • उकडलेला बटाटा (मॅश केलेला)

  • कांदा (बारीक चिरलेला)

  • टोमॅटो (बारीक चिरलेला)

  • शिमला मिरची (बारीक चिरलेली)

  • मीठ

सकाळच्या नाश्त्याचे टेंशन विसरा! मुलांच्या आवडीचे व्हेज सँडविच फक्त १० मिनिटांत तयार
भाजणीशिवाय खुसखुशीत, खमंग थालीपीठ! नाश्त्याला झटपट तयार करा 'ही' सोपी रेसिपी
  • काळी मिरी पावडर

  • चाट मसाला

  • हिरवी मिरची (पर्यायी)

  • बटर

  • हिरवी चटणी

  • मेयोनेझ

  • चीज स्प्रेड

  • टोमॅटो सॉस

  • किसलेले चीज

कृती :

क्रिमी व्हेज सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम उकडलेला बटाटा मोठ्या बाऊलमध्ये मॅश करून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची घालून सर्व साहित्य छान एकत्र करा. आता या मिश्रणात मीठ, काळी मिरी पावडर आणि चाट मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर मेयोनेझ आणि चीज स्प्रेड घालून मिश्रणाला क्रिमी टेक्स्चर द्या.

सकाळच्या नाश्त्याचे टेंशन विसरा! मुलांच्या आवडीचे व्हेज सँडविच फक्त १० मिनिटांत तयार
रोजचे पोहे-उपमा सोडा; मुलांसाठी नाश्त्यात बनवा चवदार स्प्रिंग रोल्स!

दरम्यान, तव्यावर ब्रेड स्लाईस दोन्ही बाजूंनी हलकेसे भाजून घ्या. भाजलेल्या ब्रेडवर हिरवी चटणी लावून त्यावर तयार केलेलं क्रिमी भाज्यांचं मिश्रण समान पसरवा. त्यावर किसलेलं चीज आणि टोमॅटो सॉस लावून दुसरा ब्रेड स्लाईस ठेवत सॅंडविच बंद करा. झालं तुमचं झटपट आणि टेस्टी क्रिमी व्हेज सँडविच तयार!

logo
marathi.freepressjournal.in