
दिवे लावून अंधार दूर करण्याचा आणि मनातला प्रकाश जागवण्याचा सण म्हणजे दिवाळी! आनंद, ऐक्य आणि प्रेमाचा हा उत्सव साजरा करताना आपल्या जवळच्यांना शुभेच्छा देणंही तितकंच खास असतं. मग या दिवाळीत तुमच्या प्रियजनांना फेसबुक, व्हॉट्सअॅपवर पाठवा हे खास मराठमोळे शुभेच्छा संदेश!
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
दिवाळीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!!!
.........................................
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
.........................................
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
.........................................
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
.........................................
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला
किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
.........................................
लक्ष दिव्यांची तोरणेल्याली,
उटण्याचा स्पर्श सुगंधी,
फराळाची लज्जत न्यारी,
रंगावलीचा शालू भरजरी,
आली आली दिवाळी आली,
पूर्ण होवो तुमच्या साऱ्या इच्छा,
आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
.........................................
रांगोळीच्या रंगांची, उटण्याच्या सुगंधाची,
आकाश कंदिलाच्या रोषणाईची,
फराळाच्या चटकदार चवीची,
ही दीपावली आनंदाची, हर्षाची, सौख्याची, समाधानाची,
दिवाळीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा...!!!
.........................................
पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
.........................................
धनाची पूजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपूजन संबंधाचा फराळ,
समृद्धी पाडवा प्रेमाची भाऊबीज,
अशा या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!