Diwali Skincare : दिवाळीत सुंदर दिसायचंय? ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा आणि त्वचेला द्या नैसर्गिक चमक!

दिवाळीचा काळ म्हणजे आनंद, नवे कपडे, मिठाई, भेटीगाठी आणि फटाके. अर्थातच स्वतःकडे लक्ष देण्याची उत्तम संधी. पण, अनेकदा या उत्साहात आपण आपल्या त्वचेची काळजी घ्यायला विसरतो. रात्री उशिरापर्यंत जागरण, सतत मेकअप करणे, सणाच्या तयारीत वाढलेला ताणतणाव, फराळ बनवताना तेलाने चेहरा काळवंडतो तर फटाक्याच्या धूराने चेहऱ्यावर होतं इन्फेक्शन.
(Photo - Canva)
(Photo - Canva)
Published on

दिवाळीचा काळ म्हणजे आनंद, नवे कपडे, मिठाई, भेटीगाठी आणि फटाके. अर्थातच स्वतःकडे लक्ष देण्याची उत्तम संधी. पण, अनेकदा या उत्साहात आपण आपल्या त्वचेची काळजी घ्यायला विसरतो. रात्री उशिरापर्यंत जागरण, सतत मेकअप करणे, सणाच्या तयारीत वाढलेला ताणतणाव, फराळ बनवताना तेलाने चेहरा काळवंडतो तर फटाक्याच्या धूराने चेहऱ्यावर होतं इन्फेक्शन. या सगळ्यामुळे चेहऱ्यावर थकवा आणि निस्तेजपणा दिसू लागतो. जर तुम्हाला या दिवाळीत चेहऱ्यावर चंद्रासारखी नैसर्गिक चमक हवी असेल, तर काही सोप्या आणि घरगुती उपायांनी ती सहज मिळवता येऊ शकते.

हायड्रेटेड राहा - सुंदर त्वचेचं पहिलं पाऊल

चमकदार त्वचा हवी असेल तर सर्वात आधी शरीरात पुरेसं पाणी असणं आवश्यक आहे. सणांच्या काळात गोड पदार्थ, तळलेले स्नॅक्स आणि उशिरा झोप यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं. त्यामुळे दिवसभर पुरेसं पाणी प्या. त्यासोबत हर्बल टी, नारळ पाणी किंवा फळांचे रस घ्या. त्वचेला बाहेरून ओलावा देण्यासाठी दिवसातून दोनदा हलके मॉइश्चरायझर किंवा हायलुरोनिक ॲसिड असलेली क्रीम लावा.

एक्सफोलिएशन - मृत पेशींना निरोप

चेहऱ्यावर जमा झालेल्या मृत त्वचेच्या पेशींमुळे चेहरा निस्तेज दिसतो. आठवड्यातून दोनदा हलक्या हाताने एक्सफोलिएट करा. यासाठी घरगुती ओट आणि मधाचा स्क्रब उत्तम पर्याय आहे.
संवेदनशील त्वचेसाठी हा नैसर्गिक उपाय सुरक्षित आहे. लक्षात ठेवा, जास्त स्क्रबिंग केल्याने त्वचेला इजा होऊ शकते, म्हणून हळुवारपणे करा.

घरगुती फेस मास्क - नैसर्गिक सौंदर्याचा गुपित

महागडे पार्लर ट्रीटमेंट्स नकोत? काही हरकत नाही! घरच्या घरी नैसर्गिक फेस पॅक लावून तुम्हीच तुमच्या त्वचेचा ग्लो वाढवू शकता.

  • हळद आणि दह्याचा मास्क - चेहरा उजळवतो.

  • मध आणि लिंबाचा पॅक - त्वचा स्वच्छ आणि टवटवीत करतो.

आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक चेहऱ्यावर १५-२० मिनिटे लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. आधी मानेजवळ पॅच टेस्ट करून घ्या.

चेहऱ्याचा मसाज - रोजच्या पाच मिनिटांत मिळवा नैसर्गिक ग्लो

दररोज फक्त पाच मिनिटांचा चेहऱ्याचा मसाज तुमच्या त्वचेसाठी चमत्कार करू शकतो. बोटांनी किंवा जेड रोलरने वरच्या दिशेने हलके मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्वचेला आराम मिळतो आणि चेहरा नैसर्गिकरीत्या चमकतो.

संतुलित आहार - आतून मिळवा सौंदर्य

"तुम्ही जे खाता तेच तुमच्या चेहऱ्यावर दिसतं" हे खरं आहे! सणांच्या काळात जास्त साखर, मिठाई आणि तळलेले पदार्थ त्वचेला निस्तेज करू शकतात. त्याऐवजी आहारात फळं, भाज्या, सुकामेवा, बिया आणि ओमेगा-३ असलेले पदार्थ जसे जवस, अक्रोड यांचा समावेश करा.
पांढऱ्या साखरेऐवजी गूळ आणि तळलेल्या स्नॅक्सऐवजी बेक केलेले किंवा भाजलेले पदार्थ निवडा.

या सोप्या आणि घरगुती टिप्स फॉलो केल्यास तुम्ही सणासुदीच्या काळात तुमच्या त्वचेची नैसर्गिक काळजी सहज घेऊ शकता. पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट्सशिवायही तुम्ही दिवाळीत सुंदर, तेजस्वी आणि आत्मविश्वासाने उजळून निघालेल्या दिसाल!

logo
marathi.freepressjournal.in