Health Care: जिममध्ये जायला सुरुवात करणार आहात? 'या' चाचण्या करून घ्या!

Testing before Gym: जीम मध्ये जाण्यापूर्वी या चाचण्या केल्याने तुमचा तंदुरुस्तीचा प्रवास योग्य प्रकारे सुरू करता हे सुनिश्चित होते.
Health Care: जिममध्ये जायला सुरुवात करणार आहात? 'या' चाचण्या करून घ्या!
Freepik
Published on

Healthy Lifestyle: जिममध्ये जाणे हा आरोग्य आणि तंदुरुस्ती सुधारण्यासाठी एक उत्तम निर्णय आहे. तथापि, कोणतेही नवीन व्यायाम प्रकार सुरू करण्याआधी, आपले शरीर या व्यायामप्रकारांसाठी तयार आहे का हे पाहण्यासाठी काही आरोग्य चाचण्या करून घेणे गरजेचे आहे. या चाचण्यांमुळे तुम्हाला काही आरोग्य समस्या आहेत का हे समजते आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे व्यायाम करू शकता याबद्दल माहिती मिळते. डॉ. सिद्धार्थएम. शाह, कन्सल्टंट - ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंटसर्जन, (एसएल रहेजा हॉस्पिटल, माहीम - एफोर्टिस असोसिएट आणि डॉ. अजयशाह, व्यवस्थापकीय संचालक, न्युबर्ग अजय शाह प्रयोगशाळा) यांच्याकडून अधिक मी माहिती जाणून घ्या.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मूल्यांकन

आपले हृदय आणि फुफ्फुस किती चांगले कार्य करीत आहेत हे समजून घेण्यासाठी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या चाचण्या करून घेणे महत्वाचे आहे. यामध्ये बऱ्याचदा ईसीजी, छातीचा एक्स-रे किंवा2डी-इको चाचण्या केल्या जातात ज्यामध्ये हृदयाची रचना आणि कार्य याबद्दल माहिती मिळते. यामध्ये स्ट्रेस टेस्ट देखील असू शकते, त्यामध्ये तुम्ही ट्रेडमिल किंवा स्थिर बाईकवर व्यायाम करत असताना तुमचा हार्ट रेट, रक्तदाब आणि श्वासोच्छवास तपासण्यात येतो. या चाचणी मध्ये हृदयाशी संबधित काही समस्या असेल तर ती समजते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्तीच्या पातळीचे मूल्यांकन केले जाते, आणि तुमचे हृदय हे नवीन व्यायाम प्रकार हाताळू शकते का हे पाहिले जाते.

रक्तदाब तपासणी

उच्च रक्तदाब एक सायलंट किलर असू शकतो, ज्याची लक्षणे अनेकदा खूप उशीर होईपर्यंत समजत नाहीत. रक्तदाब चाचणी केल्याने तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे का समजते, कोणतेही व्यायाम प्रकार सुरू करण्याआधी त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुमचा रक्तदाब जास्त असेल तर तुमचे डॉक्टर तो नियंत्रित करण्यासाठी जीवनशैलीत बदल किंवा औषधे घेण्याचा सल्ला देतात.

रक्त चाचण्या

रक्त चाचण्यामध्ये तुमच्या एकूण आरोग्याची माहिती मिळते. यामध्ये, कोलेस्टेरॉल पातळी, रक्तातील साखरेची पातळी आणि हिमोग्लोबिनचा समावेश आहे. उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयरोग होऊ शकतो आणि रक्तातील साखरेची पातळी जास्त असणे हे मधुमेहाचे लक्षण मानले जाते. दोन्ही प्रकारचे आजार असताना कठीण व्यायाम प्रकार सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

शरीर रचना विश्लेषण

वास्तववादी फिटनेस गोल ठरविण्यासाठी तुमच्या शरीराची रचना समजून घेणे गरजेचे असते. या विश्लेषणातून तुमच्या शरीरातील स्नायू, पाणी आणि हाडे आणि चरबीची टक्केवारी मोजली जाते. बायोइलेक्ट्रिकल इम्पेडन्स अॅनालिसिस (बीआयए) किंवा ड्युअल -एनर्जी एक्स-रे अॅब्सॉरबीटी (डीएक्सए) सारख्या पद्धती अचूक माहिती देतात. आपल्या शरीराची रचना जाणून घेतल्यास व्यायाम आणि डाएट प्लॅन प्रभावीपणे तयार करण्यात मदत होते.

मस्कुलोस्केलेटल मूल्यांकन

मस्कुलोस्केलेटल मूल्यांकनामध्ये तुमचे सांधे, हाडे आणि स्नायूंचे मूल्यांकन केले जाते. या मूल्यांकनामध्ये, काळजी घेण्यासारख्या जखमा, कमकुवतपणा किंवा असंतुलन आहे का, हे समजते. व्यायाम करताना दुखापती टाळण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. या चाचण्यातील निष्कर्षांनुसार तुमचे डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्ट कोणते व्यायाम करावे किंवा त्यात काही बदल आवश्यक असल्यास सांगतात.

फिटनेस असेसमेंट

फिटनेस असेसमेंट, तुमचे सामर्थ्य, लवचिकता, सहनशक्ती आणि समतोल यानुसार तुम्ही किती तंदुरुस्त आहात, याची माहिती देते. सामान्य चाचण्यांमध्ये पुश-अप, सिट-अप, तर सिट-अँड-रीच सारखी लवचिकता चाचणी, वेळ लावून धावणे किंवा चालणे यासारख्या सहनशक्ती चाचण्यांचा समावेश आहे. या चाचण्या एक बेसलाइन नक्की करण्यात आणि त्याय आणि कालांतराने प्रगती करणे याकडे लक्ष ठेवण्यास मदत करतात.

पोषण मूल्यांकन

पोषण मूल्यांकनात तुमचा आहार आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन याचे विश्लेषण करण्यात येते. फूड डायरी, प्रश्नावली आणि आहारतज्ज्ञांशी सल्लामसलत यामाध्यमातून हे केले जाऊ शकते. तुम्ही ज्याप्रकरचे व्यायाम करता त्याला पूरक आणि तंदुरुस्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, पोषक आहार घेणे आवश्यक आहे.

थोडक्यात, जीम मध्ये जाण्यापूर्वी या चाचण्या केल्याने तुमचा तंदुरुस्तीचा प्रवास योग्य प्रकारे सुरू करता हे सुनिश्चित होते. या चाचण्या, संभाव्य आरोग्य समस्या समजण्यास, दुखापती रोखण्यास आणि तुमच्या गरजा आणि क्षमतेनुसार व्यायाम योजना तयार करण्यात मदत करतात.या मूल्यांकनासाठी वेळ देऊन तुम्ही अधिक प्रभावी आणि सुरक्षित व्यायाम करू शकता, परिणामी तुम्हाला तुमचे फिटनेस ध्येय अधिक कार्यक्षमतेने साध्य करण्यात मदत करू शकतात.

logo
marathi.freepressjournal.in