तोंडात टाकताच विरघळेल अशी दुधीची बर्फी; मुलांनाही आवडेल ही सोपी रेसिपी

सणासुदीला किंवा अचानक पाहुणे आल्यावर झटपट गोड पदार्थ बनवायचा असेल तर दुधीची मऊशार बर्फी ट्राय करा. मावा किंवा पाक न करता साहित्य, कृती आणि खास टिप्ससह जाणून घ्या सोपी रेसिपी.
तोंडात टाकताच विरघळेल अशी दुधीची बर्फी; मुलांनाही आवडेल ही सोपी रेसिपी
तोंडात टाकताच विरघळेल अशी दुधीची बर्फी; मुलांनाही आवडेल ही सोपी रेसिपी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

सण-समारंभ असो, पूजा असो किंवा घरी अचानक पाहुणे आले असतील, गोड पदार्थ काय बनवायचा हा प्रश्न नेहमीच पडतो. अशावेळी नेहमीचा शिरा किंवा खीर करण्याऐवजी दुधी भोपळ्याची मऊशार बर्फी ट्राय करू शकता. दुधीची भाजी न आवडणाऱ्या मुलांनाही हा गोड पदार्थ आवडू शकतो. विशेष म्हणजे यासाठी वेगळा पाक किंवा मावा तयार करण्याची गरज नाही.

साहित्य -

  • १ मध्यम आकाराचा दुधी भोपळा

  • २ ते ३ टेबलस्पून साजूक तूप

  • १ कप दूध

  • २ कप ओल्या नारळाचा किस

  • ½ कप मिल्क पावडर

  • ३ ते ४ टेबलस्पून दूध

  • ¾ कप साखर

तोंडात टाकताच विरघळेल अशी दुधीची बर्फी; मुलांनाही आवडेल ही सोपी रेसिपी
गोड खायचंय पण कॅलरी वाढण्याची भीती? चिंता सोडा अन् झटपट बनवा पौष्टिक चणा-मखाणा बर्फी
  • १ टीस्पून वेलची पावडर

  • ३ ते ४ केशर काड्या

  • चिमूटभर हिरवा खाण्याचा रंग, ऐच्छिक

  • १ ते २ टेबलस्पून बारीक कापलेले बदाम-पिस्ते

कृती -

दुधीची साल काढून तो जाडसर किसून घ्या आणि त्यातील अतिरिक्त पाणी हलक्या हाताने पिळून काढा. कढईत तूप गरम करून दुधी ४ ते ५ मिनिटे परता. त्यात एक कप दूध घालून दुधी मऊ होईपर्यंत शिजवा.

आता नारळाचा किस घालून काही मिनिटे परता. मिल्क पावडर थोड्या दुधात गाठी न राहता मिसळून कढईत घाला. त्यानंतर साखर, वेलची, केशर आणि आवडीनुसार हिरवा रंग मिसळा. मिश्रण घट्ट होऊन कढईच्या कडा सोडू लागल्यावर तूप लावलेल्या ताटात पसरवा. वर बदाम-पिस्ते घालून थंड झाल्यावर वड्या कापा.

तोंडात टाकताच विरघळेल अशी दुधीची बर्फी; मुलांनाही आवडेल ही सोपी रेसिपी
Shravan Special : श्रावणी सोमवारसाठी खास रेसिपी; फक्त ३ पदार्थ आणि मऊसूत दूध बर्फी तयार

खास टिप्स -

दुधीतील अतिरिक्त पाणी नक्की काढा, अन्यथा बर्फी सैल होऊ शकते. मिल्क पावडर थेट न घालता आधी दुधात मिसळल्यास बर्फीला मऊ आणि एकसारखं टेक्स्चर मिळतं.

logo
marathi.freepressjournal.in