गोड खायचंय पण काहीतरी वेगळं? दुधी हलव्याच्या दोन भन्नाट रेसिपी

दुधी हलवा ज्याला काहीजण दुधीची खीर असेही म्हणतात. हा हलवाही दोन वेगवेगळ्या प्रकारे छान तयार करता येतो. दोन्ही पद्धती झटपट, सोप्या आणि चवीला अप्रतिम!
गोड खायचंय पण काहीतरी वेगळं? दुधी हलव्याच्या दोन भन्नाट रेसिपी
गोड खायचंय पण काहीतरी वेगळं? दुधी हलव्याच्या दोन भन्नाट रेसिपी
Published on

गोड खायची इच्छा झाली की आपल्या घरात साधा शिरा, खीर, शेवया किंवा गुलाबजाम यासारखे पदार्थ केले जातात. पण या प्रत्येक पदार्थाचे वेगवेगळे प्रकार असल्यास त्यांच्या चवीतही छानसा बदल जाणवतो. अगदी त्याचप्रमाणे दुधी हलवा ज्याला काहीजण दुधीची खीर असेही म्हणतात. हा हलवाही दोन वेगवेगळ्या प्रकारे छान तयार करता येतो. दोन्ही पद्धती झटपट, सोप्या आणि चवीला अप्रतिम!

चला तर, पाहूया दुधी हलव्याच्या २ उत्तम रेसिपी...

साहित्य

  • दुधी (किसून)

  • दूध

  • साखर

  • तूप

  • सुकामेवा (काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे)

  • वेलची पूड

  • (दुसऱ्या रेसिपीसाठी) खवा

गोड खायचंय पण काहीतरी वेगळं? दुधी हलव्याच्या दोन भन्नाट रेसिपी
रोजचे पोहे-उपमा सोडा; मुलांसाठी नाश्त्यात बनवा चवदार स्प्रिंग रोल्स!

रेसिपी १ : पारंपरिक दुधी हलवा

कृती

  • दुधी स्वच्छ धुऊन, सालं काढून बारीक किसून घ्या.
    रंग न बदलण्यासाठी थोडावेळ पाण्यात ठेवा.

  • कढईत थोडं तूप घेऊन सुकामेवा परतून घ्या आणि वेगळा काढून ठेवा.

  • त्याच कढईत चमचाभर तूप टाकून किसलेला दुधी छान खमंग होईपर्यंत परतून घ्या.

  • दुधी मऊ झाला की त्यात एक कप दूध घाला आणि ढवळत राहा.

  • नंतर चवीपुरती साखर घालून मिश्रण घट्ट होऊ द्या.

  • शेवटी उरलेलं थोडं दूध, परतलेला मेवा आणि वेलची पूड मिसळा.

  • दोन–तीन मिनिटांनी गॅस बंद करा. सुगंधी दुधी हलवा तयार!

रेसिपी २ : खवा घातलेला दुधी हलवा

कृती

  • पहिल्या रेसिपीप्रमाणेच सर्व प्रक्रिया करा.

  • पण साखर घातल्यानंतर त्यात एक वाटी खवा घाला.

  • खवा हलव्याला छान दाटपणा आणि श्रीखंडासारखा स्वाद देतो.

  • सुकामेवा आणि वेलची पूड घालून हलवा तयार.

दोन्ही पद्धतींची चव वेगळी आणि मस्त!

एक हलका-फुलका आणि पारंपरिक, तर दुसरा पटकन तोंडात विरघळणारा! दोन्ही रेसिपी एकदा करून बघा आणि कोणता तुम्हाला अधिक आवडतो ते पाहा!

logo
marathi.freepressjournal.in