

संध्याकाळच्या वेळेस काहीतरी चटपटीत, हलकं आणि झटपट खायची इच्छा होते. अशावेळी शेव पुरी हा सगळ्यांचाच आवडता नाश्ता ठरतो. बाजारासारखी चवदार शेव पुरी तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया रेसिपी.
शेव पुरीसाठी लागणारे साहित्य
पुरी - १० ते १२
उकडलेले बटाटे (चिरलेले) - १ कप
उकडलेले हरभरे / पांढरे वाटाणे - अर्धा कप
कांदा (बारीक चिरलेला) - अर्धा कप
टोमॅटो (बारीक चिरलेला) - अर्धा कप
हिरवी चटणी - २ टेबलस्पून
गोड चिंचेची चटणी - २ टेबलस्पून
शेव - आवडीनुसार
मीठ - चवीनुसार
लाल तिखट - अर्धा टीस्पून
चाट मसाला - अर्धा टीस्पून
कोथिंबीर - सजावटीसाठी
शेव पुरी बनवण्याची कृती
एका प्लेटमध्ये पुरी नीट मांडून घ्या.
प्रत्येक पुरीवर थोडेसे उकडलेले बटाटे आणि हरभरे ठेवा.
त्यावर कांदा आणि टोमॅटो घाला.
आता हिरवी आणि गोड चटणी प्रत्येकी थोडी थोडी घाला.
वरून मीठ, लाल तिखट आणि चाट मसाला शिंपडा.
भरपूर शेव टाका आणि कोथिंबीर घालून सजवा.
शेव पुरी लगेच सर्व्ह करा, नाहीतर पुरी मऊ होते.