घरगुती उपायांमध्ये चेहऱ्यावर वाफ घेणं हा एक सगळ्यांना माहित असलेला पण अनेकदा चुकीच्या पद्धतीने केला जाणारा उपाय आहे. त्वचा सुंदर, स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी वाफ घेणं महत्त्वाचं असलं तरी ते कसं आणि किती वेळ घ्यायचं हे फार थोड्यांना माहित असतं.
वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील त्वचेचे रंध्रे (pores) उघडतात. यामुळे त्वचेतील तेल, धूळ आणि अशुद्धी बाहेर पडते. परंतु अत्याधिक वाफ घेतल्यास त्वचा कोरडी, ताठ आणि संवेदनशील होऊ शकते.
एका मोठ्या भांड्यात पाणी उकळून घ्या.
चेहरा त्या उकळलेल्या पाण्याच्या वाफेजवळ ठेवा पण खूप जवळ नेऊ नका. सुमारे ८ ते १० इंचांचे अंतर ठेवा.
डोक्यावर टॉवेल झाकून ५ ते ७ मिनिटांपर्यंत वाफ घ्या.
वाफ घेतल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा आणि मॉइश्चरायझर लावा.
तुमची त्वचा तेलकट असेल तर आठवड्यात २ वेळा,
तर कोरडी त्वचा असल्यास ७-१० दिवसांतून एकदाच वाफ घेणं योग्य.
या गोष्टी लक्षात ठेवा
वाफ घेताना चेहरा खूप जवळ नेऊ नका.
डोळे बंद ठेवा, अन्यथा जळजळ होऊ शकते.
चेहऱ्यावर उघड्या जखमा किंवा सूज असेल तर वाफ घेऊ नका.
वाफ घेताना पाण्यात काही हर्बल घटक टाकल्यास त्वचेला अधिक फायदे मिळतात. तुळस, कडुलिंब, हळद किंवा गुलाबपाणी वापरल्यास त्वचा स्वच्छ आणि जीवाणूमुक्त राहते.
योग्य पद्धतीने घेतलेली वाफ तुमचं सौंदर्य नैसर्गिकरीत्या खुलवू शकते. चुकीच्या पद्धतीने घेतली, तर उलट नुकसान होऊ शकतं! त्यामुळे आजपासून वाफ घ्या, पण योग्य रीतिने.
(Disclaimer: या माहितीमध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)
