Friendship Day Special: खवय्या मित्रासाठी 'या' ५ झटपट रेसिपीज

घरातलेच थोडेफार जिन्नस वापरून अगदी १० मिनिटांत तयार होणाऱ्या काही सोप्या रेसिपीज इथे आहेत. ट्राय करा आणि तुमचा खवय्या दोस्त लगेच खुश!
Friendship Day Special: खवय्या मित्रासाठी 'या' ५ झटपट रेसिपीज
canva
Published on

'फ्रेंडशिप डे'च्या खास दिवशी तुमच्या ‘खवय्या’ मित्राला खुश करायचंय? मग गिफ्ट वगैरे नको तर, त्यांच्या तोंडाला पाणी सुटेल असं काहीतरी बनवा. घरातलेच थोडेफार जिन्नस वापरून अगदी १० मिनिटांत तयार होणाऱ्या काही सोप्या रेसिपीज इथे आहेत. ट्राय करा आणि तुमचा खवय्या दोस्त लगेच खुश!

१. चीज गार्लिक ब्रेड

canva

साहित्य:

४ ब्रेड स्लाइस

लोणी (बटर)

किसलेला लसूण

½ कप किसलेले चीज

मिक्स हर्ब्स / ऑरेगानो

चवीनुसार मीठ

कृती:

बटरमध्ये लसूण मिसळून ब्रेडच्या एका बाजूला लावा. वर किसलेलं चीज शिंपडा आणि थोडं हर्ब्स टाका. मायक्रोवेवमध्ये २-३ मिनिटं बेक करा किंवा नॉनस्टिक तव्यावर झाकण ठेवून भाजा. चीज वितळलं की सर्व्ह करा!

...................................................................

२. मसाला मखाना चाट

Canva

साहित्य:

1 वाटी भाजलेले मखाने

¼ कप बारीक चिरलेला कांदा

¼ कप चिरलेला टोमॅटो

१ चमचा लिंबाचा रस

½ चमचा चाट मसाला

कोथिंबीर, मीठ

कृती:

सर्व साहित्य एका बोलमध्ये टाका. नीट मिक्स करा. थोडी कोथिंबीर वरून शिंपडा आणि तात्काळ सर्व्ह करा!

...................................................................

३. इंस्टंट ब्रेड पिझ्झा

canva

साहित्य:

ब्रेड स्लाइस

२ चमचा टोमॅटो सॉस

कांदा, टोमॅटो, शिमला मिर्ची (बारीक चिरून)

किसलेले चीज

ऑरेगानो, चिली फ्लेक्स

कृती:

ब्रेडवर टोमॅटो सॉस लावा. त्यावर भाज्या आणि चीज टाका. नॉनस्टिक तव्यावर झाकण ठेवून ५-६ मिनिटं मंद आचेवर भाजा. वरून हर्ब्स टाका आणि सर्व्ह करा!

...................................................................

४. कॉर्न चीज टोस्ट

canva

साहित्य:

१ कप उकडलेला स्वीटकॉर्न

½ कप किसलेले चीज

बटर

१ चमचा मिक्स हर्ब्स

२ ब्रेड स्लाइस

मीठ, मिरी

कृती:

कॉर्न, चीज, हर्ब्स, मीठ व मिरी एकत्र करून मिश्रण तयार करा. हे मिश्रण ब्रेडवर लावा. बटर लावून टोस्ट सेंडविच मेकर / तव्यावर कुरकुरीत होईपर्यंत भाजा. गरमागरम सर्व्ह करा!

...................................................................

५. चॉकलेट पीनट बटर बाइट्स

canva

साहित्य:

८ पार्ले/मॅरी बिस्किट्स

४ चमचा पीनट बटर

½ कप डार्क चॉकलेट

थोडं तूप (चॉकलेट वितळवताना)

कृती:

दोन बिस्किटांमध्ये पीनट बटर लावून सँडविच करा. हे सँडविच चॉकलेटमध्ये बुडवा. फ्रिजमध्ये १०-१५ मिनिटं ठेवा. थंड झाल्यावर सर्व्ह करा. अगदी स्वीट आणि क्रंची!

या झटपट रेसिपीज तुमच्या मैत्रीला आणखी खास आणि चवदार बनवतील. ट्राय करा आणि आनंद साजरा करा… Happy Friendship Day!

Friendship Day Special: खवय्या मित्रासाठी 'या' ५ झटपट रेसिपीज
Happy Friendship Day 2025 : नातं मैत्रीचं... तुमच्या जिवलग मित्र-मैत्रिणींना पाठवा हे खास मराठी शुभेच्छा संदेश आणि Quotes!
logo
marathi.freepressjournal.in