अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. भाद्रपद महिना सुरू झाला की सर्वत्र उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण होते. या महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी करतात. देशभरात गणेश चतुर्थीपासून 'गणेशोत्सव' साजरा केला जातो. यंदाचा हा सोहळा अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आतापासूनच या सणाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी गणेशाचा जन्म झाला. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या उत्सवात घरोघरी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून आणि विविध धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि आरतीसह बाप्पांची पूजा केली जाते. मात्र, यंदा गणेश चतुर्थी नेमकी कधी? आणि मूर्ती स्थापनेसाठी योग्य मुहूर्त कोणता? तसेच, पूजा विधी आणि शुभ योगांबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
गणेश चतुर्थी नेमकी कधी?
पंचांगानुसार, गणेश चतुर्थीची तिथी २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १:५४ वाजता सुरू होईल आणि २७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३:४४ वाजता संपेल. या दिवशी देशभरात गणेशोत्सवाचा प्रारंभ होतो आणि भक्त श्रद्धेने गणरायाचे स्वागत करतात. धार्मिक परंपरेनुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि घराघरात उत्साहाने सण साजरा केला जातो.
गणेश चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता?
धार्मिक मान्यतेनुसार, गणेश पूजेसाठी मध्यान्ह काळ सर्वाधिक शुभ मानला जातो. यंदा २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०५ ते दुपारी १:४० हा मध्यान्ह गणेश पूजेचा मुहूर्त अत्यंत शुभ आहे. या वेळेत मूर्तीची प्रतिष्ठापना व पूजा केल्यास घरात सकारात्मकता, शांतता आणि समृद्धीचे आगमन होते, अशी श्रद्धा आहे.
गणेश चतुर्थी पूजा विधी
गणेश मूर्ती घरी आणण्यापूर्वी बाप्पाची स्थापना करण्याचे ठिकाण स्वच्छ करावे आणि त्या जागेची फुले, रांगोळी आणि इतर सजावटीने तयारी करावी. यावेळी शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पाची स्थापना करणे आवश्यक आहे. चौरंगावर लाल किंवा पिवळा कपडा पसरवून पूजेसाठी योग्य वातावरण तयार करावे. पूजा सुरू करण्यापूर्वी हातात पाणी, फुले आणि तांदूळ घेऊन प्रार्थना करावी. सर्वप्रथम ‘ॐ गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करून बाप्पाची आराधना करावी. पंचामृताने मूर्तीला स्नान घालावे आणि स्नानानंतर नवीन कपडे व दागिने घालून दुर्वा, जास्वंदाचे फूल, हळदी-कुंकू, तांदूळ इत्यादी पूजेचे साहित्य अर्पण करावे. पूजेनंतर गणपती बाप्पाची आरती करावी.
गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ योग
यंदा गणेश चतुर्थीचा दिवस खूप खास मानला जात आहे, कारण या वर्षी हा दिवस बुधवारपासून सुरू होतो, जे अत्यंत शुभ मानले जाते. यावेळी चार दिवसांचे शुभ योग तयार होत आहेत. शुभ योग, शुक्ल योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग. तसेच, पूजेच्या वेळात हस्त नक्षत्र आणि चित्रा नक्षत्र देखील आहे, जे गणपतीची पूजा करण्यासाठी अत्यंत अनुकूल मानले जातात. यामुळे यंदाची बाप्पाची पूजा अधिक मंगलकारी ठरणार आहे.
Ganesh Chaturthi 2025: लाडक्या बाप्पाचे आगमन! कोणत्या शुभ मुहूर्तावर कराल गणरायाची प्राणप्रतिष्ठापना? वाचा पूजा विधी आणि शुभ योगांची संपूर्ण माहिती