Ganeshotsav 2025 : 'तन्नो दंती प्रचोदयात'; गणेशासमोरच का म्हणावे 'अथर्वशीर्ष'?

गणेशोत्सवात गणपतीसमोर अथर्वशीर्ष म्हणण्याला विशेष महत्त्व आहे. अथर्वशीर्ष हे अथर्ववेदाशी निगडीत उपनिषद असून, यामध्ये गणेशाचे स्वरूप, त्याचे परब्रह्म म्हणून महत्त्व आणि उपासकांसाठी मिळणारे लाभ यांचा उल्लेख आहे.
Ganeshotsav 2025 : 'तन्नो दंती प्रचोदयात'; गणेशासमोरच का म्हणावे 'अथर्वशीर्ष'?
Published on

गणेशोत्सवात गणपतीसमोर अथर्वशीर्ष म्हणण्याला विशेष महत्त्व आहे. अथर्वशीर्ष हे अथर्ववेदाशी निगडीत उपनिषद असून, यामध्ये गणेशाचे स्वरूप, त्याचे परब्रह्म म्हणून महत्त्व आणि उपासकांसाठी मिळणारे लाभ यांचा उल्लेख आहे. पण, अथर्वशीर्ष केवळ गणपतीसमोरच का म्हणतात? चला तर जाणून घेऊया.

अथर्वशीर्ष म्हणजे काय?

  • हे उपनिषद गणक ऋषींनी रचले आहे.

  • 'थर्व' म्हणजे चंचल आणि 'अथर्व' म्हणजे स्थिर. 'शीर्ष' म्हणजे मस्तक.

  • ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता मिळते, तो ग्रंथ म्हणजे अथर्वशीर्ष.

  • यात प्रथम गणेशाच्या सगुण स्वरूपाची उपासना सांगितली आहे आणि शेवटी गणेशच परब्रह्म आहे, असे नमूद केले आहे.

गणपतीसमोर अथर्वशीर्ष म्हणण्याचे कारण

  • गणपती हा विघ्नहर्ता आणि बुद्धीचा अधिपती मानला जातो.

  • अथर्वशीर्षात गणपतीचे ज्ञानमय आणि विज्ञानमय स्वरूप वर्णन केलेले आहे. त्यामुळे त्याचे पठण केल्याने बुद्धीला स्थिरता आणि शुद्धता प्राप्त होते.

  • या पठणाने पापांचा नाश होतो, वाक्-सिद्धी मिळते आणि जीवनात यशाचा मार्ग सुकर होतो, असे मानले जाते.

  • गणपतीसमोर अथर्वशीर्ष म्हणणे म्हणजे त्याच्याशी थेट संवाद साधणे व त्याची प्रसन्नता मिळवणे.

अथर्वशीर्ष म्हणताना काही नियम सांगितलेले आहेत -

  • उच्चार शुद्ध ठेवणे.

  • स्नान करून, शुद्ध आसनावर बसून पठण करणे.

  • दक्षिण दिशा टाळून इतर दिशेला तोंड करून बसणे.

  • पूजा करून किंवा मनोभावे गणेशाचे ध्यान करून पठण सुरू करणे.

फलश्रुती

अथर्वशीर्षाचा एक हजार वेळा जप केल्यास जे हवे ते फळ मिळते, अशी श्रद्धा आहे. एकवीस वेळा पठण म्हणजे एक संपूर्ण अभिषेक मानला जातो. म्हणूनच गणपतीसमोर अथर्वशीर्ष म्हणणे हे फक्त धार्मिक विधी नसून, बुद्धीची एकाग्रता, मन:शांती आणि गणेशाची कृपा मिळवण्याचा मार्ग आहे.

logo
marathi.freepressjournal.in