Ganeshotsav 2026 : गोडवा अन् कुरकुरीतपणा एकत्र; घरच्या घरी ट्राय करा चॉकलेट-बटरस्कॉच मोदक

पारंपरिक उकडीच्या मोदकांसोबत यंदा काहीतरी वेगळं करून पाहायचं असेल, तर चॉकलेट आणि बटरस्कॉच मोदक हा भन्नाट पर्याय ठरू शकतो.
Ganeshotsav 2026 : गोडवा अन् कुरकुरीतपणा एकत्र; घरच्या घरी ट्राय करा चॉकलेट-बटरस्कॉच मोदक
Ganeshotsav 2026 : गोडवा अन् कुरकुरीतपणा एकत्र; घरच्या घरी ट्राय करा चॉकलेट-बटरस्कॉच मोदक'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

गणेशोत्सव म्हटलं की घराघरात गोड पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य मानला जात असल्याने या दिवसांत विविध प्रकारचे मोदक आवर्जून केले जातात. पारंपरिक उकडीच्या मोदकांसोबत यंदा काहीतरी वेगळं करून पाहायचं असेल, तर चॉकलेट आणि बटरस्कॉच मोदक हा भन्नाट पर्याय ठरू शकतो. चॉकलेटची चव आणि बटरस्कॉचचा क्रंच यामुळे हे मोदक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील. विशेष म्हणजे हे मोदक बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही. चला तर मग, घरच्या घरी चॉकलेट-बटरस्कॉच मोदक कसे बनवायचे ते जाणून घेऊया.

Ganeshotsav 2026 : गोडवा अन् कुरकुरीतपणा एकत्र; घरच्या घरी ट्राय करा चॉकलेट-बटरस्कॉच मोदक
Ganeshotsav 2026 : गोड खायचंय, पण डाएटही करायचंय? मग बनवा ड्रायफ्रूट्सचे पौष्टिक मोदक

साहित्य :

चॉकलेट मोदकासाठी -

  • १ कप मिल्क पावडर

  • अर्धा कप कंडेन्स्ड मिल्क

  • २ टेबलस्पून कोको पावडर

  • १ टेबलस्पून तूप

  • २ ते ३ टेबलस्पून दूध

  • अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स

  • बारीक चिरलेले काजू-बदाम

Ganeshotsav 2026 : गोडवा अन् कुरकुरीतपणा एकत्र; घरच्या घरी ट्राय करा चॉकलेट-बटरस्कॉच मोदक
Ganesh Chaturthi 2026 : यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पासाठी ट्राय करा 'हे' स्पेशल मोदक; जाणून घ्या रेसिपी

बटरस्कॉच मोदकासाठी -

  • १ कप मिल्क पावडर

  • अर्धा कप कंडेन्स्ड मिल्क

  • १ टेबलस्पून तूप

  • २ ते ३ टेबलस्पून दूध

  • अर्धा टीस्पून बटरस्कॉच इसेन्स

  • पाऊण कप बटरस्कॉच क्रश

  • काजू-बदामाचे काप

Ganeshotsav 2026 : गोडवा अन् कुरकुरीतपणा एकत्र; घरच्या घरी ट्राय करा चॉकलेट-बटरस्कॉच मोदक
Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा सुगंधी केसर मोदक; आताच नोट करा सोपी रेसिपी

कृती :

१. चॉकलेटचे मिश्रण तयार करा : सर्वप्रथम नॉनस्टिक कढईत तूप गरम करा. त्यात कंडेन्स्ड मिल्क, मिल्क पावडर आणि कोको पावडर घाला. हे मिश्रण मंद आचेवर सतत हलवत राहा.

२. मिश्रण मऊ करा : मिश्रण घट्ट होऊ लागल्यास त्यात थोडे दूध घाला. सर्व साहित्य एकजीव झाल्यावर त्यात व्हॅनिला इसेन्स आणि काजू-बदाम घाला. मिश्रण कढईच्या कडा सोडू लागले की गॅस बंद करा.

३. बटरस्कॉचचे मिश्रण तयार करा : दुसऱ्या कढईत तूप, कंडेन्स्ड मिल्क आणि मिल्क पावडर घालून मंद आचेवर शिजवा. मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर त्यात दूध आणि बटरस्कॉच इसेन्स घाला.

४. बटरस्कॉच क्रश मिसळा : गॅस बंद केल्यानंतर मिश्रण थोडे कोमट होऊ द्या. त्यात बटरस्कॉच क्रश आणि काजू-बदाम घालून व्यवस्थित मिसळा.

Ganeshotsav 2026 : गोडवा अन् कुरकुरीतपणा एकत्र; घरच्या घरी ट्राय करा चॉकलेट-बटरस्कॉच मोदक
Ganeshotsav 2026 : उकडीचे नाही, आता बनवा माव्याचे मोदक; चवीला भन्नाट, बनवायलाही अगदी सोपे, वाचा रेसिपी

५. मोदकाचा आकार द्या : दोन्ही मिश्रणे थोडी कोमट असतानाच हाताला तूप लावून छोटे गोळे करून घ्या. मोदकाच्या साच्याला हलके तूप लावून त्यात मिश्रण भरून घट्ट दाबा. साचा उघडून मोदक अलगद बाहेर काढा.

६. सजावट करा : तयार मोदकांवर बारीक चिरलेले काजू-बदाम, चॉकलेट किंवा बटरस्कॉच क्रश घालून सजवा. काही वेळ सेट होऊ दिल्यानंतर हे मोदक बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण करता येतील.

टिप्स :

  • मिश्रण शिजवताना गॅस नेहमी मंद ठेवा, त्यामुळे मिश्रण कढईला चिकटणार नाही.

  • मिल्क पावडरचे गुठळे होऊ नयेत यासाठी ते आधी चाळून घेणे चांगले.

  • मिश्रण खूप घट्ट वाटल्यास थोडे दूध घालून त्याची कन्सिस्टन्सी मऊ करता येते.

  • मोदकाच्या साच्याला हलके तूप लावल्यास मोदक सहज बाहेर निघतो.

  • बटरस्कॉच क्रश गॅस बंद केल्यानंतर मिसळल्यास त्याचा कुरकुरीतपणा काही प्रमाणात टिकून राहतो.

Ganeshotsav 2026 : गोडवा अन् कुरकुरीतपणा एकत्र; घरच्या घरी ट्राय करा चॉकलेट-बटरस्कॉच मोदक
Ganeshotsav 2026 : तोंडात टाकताच विरघळतील! घरीच बनवा मऊसूत खोबऱ्याचे लाडू, वाचा सोपी रेसिपी
  • मोदक पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवता येतात.

  • घरातील लहान मुलांना आवडेल अशी चव हवी असल्यास मोदकांवर चॉकलेट स्प्रिंकल्स किंवा बारीक चॉकलेट चिप्सही घालू शकता.

logo
marathi.freepressjournal.in