चेहऱ्याचं तेज हरवलंय? करा हे सोपे घरगुती उपाय

दिवसभराचं काम, झोपेची कमी, प्रदूषण आणि तणाव यामुळे अनेकांना चेहऱ्यावर थकवा, रूक्षपणा आणि तेज हरवलेलं जाणवतं. पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशियल करण्याऐवजी काही घरगुती उपाय अवलंबल्यास चेहऱ्याचा नूर परत मिळवता येतो; तेही नैसर्गिकरित्या!
चेहऱ्याचं तेज हरवलंय? करा हे सोपे घरगुती उपाय
Published on

दिवसभराचं काम, झोपेची कमी, प्रदूषण आणि तणाव यामुळे अनेकांना चेहऱ्यावर थकवा, रूक्षपणा आणि तेज हरवलेलं जाणवतं. पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशियल करण्याऐवजी काही घरगुती उपाय अवलंबल्यास चेहऱ्याचा नूर परत मिळवता येतो; तेही नैसर्गिकरित्या!

हे घरगुती उपाय तुमचं सौंदर्य खुलवतील -

१. बेसन आणि हळदीचा फेसपॅक

एक चमचा बेसन, अर्धा चमचा हळद आणि थोडं दुध मिसळून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर लावून 15 मिनिटं ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुवा. त्वचा उजळ दिसते.

२. दुधात भिजवलेली बदाम पेस्ट

रात्री भिजवलेले ४-५ बदाम सकाळी वाटून त्यात थोडं दुध मिसळा. चेहऱ्यावर लावून 10 मिनिटांनी धुवा. त्वचेला पोषण मिळतं आणि नैसर्गिक चमक येते.

३. कोरफडीचा गर

रोज झोपण्याआधी कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावल्याने त्वचेतील ओलावा टिकतो आणि थकवा कमी होतो.

४. पुरेशी झोप

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पुरेशी झोप. रोज ७-८ तासांची झोप त्वचेला नैसर्गिकरित्या पुनर्जवित करते.

५. पाणी आणि फळांचा समावेश

जास्तीत जास्त पाणी प्या आणि आहारात मोसंबी, संत्रं, पपई, काकडी यांचा समावेश करा. यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला आतून तेजस्वी करतात.

logo
marathi.freepressjournal.in