
गुरु पौर्णिमा २०२५ मध्ये कधी साजरी करायची याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. त्यामुळे या लेखातून आपण यंदाची योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा कशी करायची याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
गुरु पौर्णिमा कधी आहे?
या वर्षी गुरु पौर्णिमा १० जुलै २०२५ रोजी साजरी केली जाईल. कारण पौर्णिमा तिथी १० जुलै रोजी रात्री १ वाजून ३६ मिनिटांनी सुरू होऊन ११ जुलै रोजी रात्री २ वाजून ६ मिनिटांनी संपेल. उदयतिथी १० जुलैला येत असल्याने त्याच दिवशी गुरु पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.
गुरु पौर्णिमेचे विशेष योग
यंदाच्या गुरु पौर्णिमेला इंद्र योग आणि वैधृति योग तयार होत आहेत. तसेच या दिवशी भद्राकाल देखील असेल, परंतु तो पाताळ लोकात असल्यामुळे त्याचा काही परिणाम होणार नाही.
गुरु पौर्णिमा पूजन विधी
या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करावे.
घरातील देवघराची स्वच्छता करून, गुरूंची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी.
त्यानंतर तूपाचा दिवा, फुले, अक्षता, चंदन, जनेऊ, फळे आणि मिठाई अर्पण करून आरती करावी.
गुरूंना श्वेत चंदन आणि पिवळ्या वस्त्रांचा नैवेद्य अर्पण करावा.
गुरुंचे आशीर्वाद घ्यावेत आणि 108 वेळा 'ॐ ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरुवे नमः' या बृहस्पति बीज मंत्राचा जप करावा.
गुरु दोषापासून मुक्तीसाठी उपाय
या दिवशी पिवळ्या वस्त्रांचे दान, गुरूंना वस्त्र भेट, आणि गायीसाठी चणे, गूळ इत्यादी दान केल्याने गुरु दोषाचा नाश होतो असे मानले जाते.
गुरुवारच्या दिवशी देवगुरु बृहस्पती आणि भगवान विष्णूची पूजा करणेही फलदायी ठरते.
(Disclaimer: हा लेख इंटरनेटवर उपलब्ध माहितीवर आधारित आहे. याची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)