'या' सवयी सोडा अन्यथा कितीही प्रयत्न केले तरी वजन कमी होणार नाही कारण...

वाढलेले वजन ही दिवसेंदिवस गंभीर होत जाणारी समस्या आहे. याबाबत जागरूरता वाढत आहे. तसेच वजन कमी करून फिट राहण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले जातात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डाएट, जीममध्ये जाऊन व्यायाम करणे, योगासन, प्राणायाम इत्यादी...मात्र काही चुकीच्या सवयी तुमच्या वजन कमी करण्याच्या या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फेरते. जाणून घ्या या सवयी कोणत्या...
'या' सवयी सोडा अन्यथा कितीही प्रयत्न केले तरी वजन कमी होणार नाही कारण...
Freepik
Published on

वाढलेले वजन ही दिवसेंदिवस गंभीर होत जाणारी समस्या आहे. याबाबत जागरूरता वाढत आहे. तसेच वजन कमी करून फिट राहण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले जातात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डाएट, जीममध्ये जाऊन व्यायाम करणे, योगासन, प्राणायाम इत्यादी...मात्र काही चुकीच्या सवयी तुमच्या वजन कमी करण्याच्या या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फेरते. जाणून घ्या या सवयी कोणत्या...

नाश्ता वगळणे

अनेकांना वाटते नाश्ता वगळल्याने कॅलरीज कमी होतील आणि वजन लवकर कमी होईल. मात्र, हा त्यांचा एक गैरसमज आहे. सकाळचा नाश्ता हा शरिराची चयापचय क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो. सकाळी नाश्ता केल्याने चयापचय क्रिया सक्रिय होते. नंतर जो आहार तुम्ही घेता त्याचे व्यवस्थित पाचन होते. मात्र, सकाळचा नाश्ता वगळला तर नंतर दिवसभर जास्त भूक लागते. परिणामी तुम्ही दिवसा अन्य वेळेला ओव्हर इटिंग करता. परिणामी वजन कमी होण्याऐवजी जैसे थे राहते. त्यामुळे ही सवय बदलणे आवश्यक आहे. आरोग्यास उत्तम असा सकाळचा नाश्ता करावा.

पुरेसे पाणी न पिणे

शरीरात पाण्याची कमतरता चयापचय प्रक्रिया मंदावते. दिवसभरात ८-१० ग्लास पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पुरेसे पाणी न पिण्याची सवय मोडणे हा उत्तम मार्ग आहे.

झोपेचा अभाव

सध्याच्या काळात अनेकजण रात्री उशिरापर्यंत जागरण करत मोबाईलवर आपल्या आवडत्या गोष्टी पाहतात. तसेच सकाळी देखील लवकर उठतात. त्याचा परिणाम वजनावर होतो. शरिराला ७ ते ८ ताासांची झोप आवश्यक आहे. कमी झोपल्याने शरीरात कॉर्टिसोल (तणाव संप्रेरक) वाढते, ज्यामुळे चरबी साठवण्यास प्रोत्साहन मिळते. तसेच, झोपेच्या कमतरतेमुळे भूकेचे संप्रेरक (हार्मोन) घ्रेलिन वाढते, ज्यामुळे जास्त अन्न खाल्ले जाते. त्यामुळे झोपेची एक नियमित वेळ ठरवून किमान ७-८ तास झोप घ्या.

व्यायामानंतर जास्त खाणे

काही लोकांना व्यायाम केल्यानंतर खूप जास्त भूक लागते. त्यामुळे ते व्यायामानंतर अधिक जेवण करतात. परंतु यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते. व्यायामानंतर निरोगी आणि संतुलित आहार घ्यावा.

कमी फायबर आणि प्रथिनांचे सेवन

प्रथिने आणि फायबरयुक्त आहारामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. ज्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. मात्र, अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करतात. या डाएटमुळे आरोग्याला फायबर आणि प्रथिने आवश्यक आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे अनेक वेळा डाएटमध्ये कमी फायबर आणि कमी प्रथिने असलेल्या अन्नाचा समावेश असतो. मात्र, हे चुकीचे आहे. वजन कमी करण्यासाठी भरपूर मात्रेत फायबर आणि प्रथिने असलेला आहार घेणे आवश्यक आहे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in