Gokulashtami 2024 Quotes In Marathi: भगवान विष्णूचा आठवा अवतार श्री कृष्ण यांचा जन्मदिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवासाठी जन्माष्टमीची रात्र विशेष मानली जाते. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता, म्हणून या दिवशी सर्वजण रात्रभर जागून त्यांचा जन्म साजरा करतात. या दिवशी, अनेकजण घरात आणि मंदिरात, लोक श्रीकृष्णाची मूर्ती झोपाळ्यात ठेवतात आणि नवीन कपडे, दागिने आणि फुलांनी सजवतात. या खास प्रसंगी, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना विशेष शुभेच्छा संदेश पाठवायचे असतील आम्ही तुमच्यासाठी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. हे खास मेसेज तुम्ही तुमच्या प्रियजनांना व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही (Happy Janmashtami 2024 Marathi Shubhechha Sandhesh Wishes, message, status, quotes) पाठवू शकता.
पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश (Janmashtami Wishes 2024)
> कृष्णाचं प्रेम,
कृष्णाची महिमा कृष्णाची श्रद्धा,
कृष्णामुळे आहे संसार
तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
(Happy Janmashtami Wishes 2024 In Marathi Post Captions Status Messages To Shri Krishna Jayanti Gokulashtamichya Hardik Shubhechha)
> जन्माष्टमी आली,
पुन्हा लोण्याचा गोडवा घेऊन आली,
कान्हाची किमया न्यारी,
दे आम्हाला तू आशीर्वाद, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!!
> मुरली मनोहर, ब्रिजचे कर्ताधर्ता
ते आहेत नंदलालचे गोपाला
बासरीच्या मोहक आवाजाने सर्व दुःख हरणारा
मुरली मनोहरचा सण गोविंदा गोपाळा
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!!
> हाथी घोडा पालखी…
जय कन्हैया लालकी,
कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!!
> ही-दूध-लोणी आहे ज्याचा छंद,
तो आमचा लाडका श्रीकृष्ण ,
सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा!!
(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)