Sawan 2024 Wishes: प्रत्येक कणा-कणात विराजमान आहे शिव, श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा पाठवा!

Shravan Somvar, Shravan 2024: श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी तुम्ही तुमच्या नातेवाईकांना मराठीत शुभेच्छा पाठवू शकता. चला बघुयात शुभेच्छा संदेश.
Sawan 2024 Wishes: प्रत्येक कणा-कणात विराजमान आहे शिव, श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा पाठवा!
Canva
Published on

Lord Shiva Sawan Somwar Vrat Dates 2024: हिंदू कॅलेंडरनुसार, सावन किंवा श्रावण महिना २२ जुलै २०२४ पासून सुरू होईल आणि १९ ऑगस्ट २०२४रोजी संपेल. यंदा श्रावण महिन्यात ५ सोमवार असतील. श्रावण महिन्याचा पहिला सोमवार २२ जुलै २०२४ रोजी आणि दुसरा, तिसरा आणि चौथा श्रावण सोमवार (सोमवार) (shravani somvar 2024) अनुक्रमे २९, ५, १२ जुलै आणि १९ ऑगस्ट २०२४ रोजी साजरा केला जाईल. या निमित्ताने तुम्ही तुमचे कुटुंब, मित्र आणि नातेवाईक यांना शुभेच्छा पाठवू शकता, तसेच फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी स्टेटस सेट (Shravan Somvar Marathi Shubhechha Sandhesh Wishes, message, status, quotes) करू शकता.

पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश

> श्रावण मास होता सुरु, शिवशंकराची पूजा करू

शंकराचा तुमच्यावर आशीर्वाद राहो या सदिच्छा

श्रावणी सोमवारच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला खूप खूप शुभेच्छा!

Sawan 2024 Wishes: प्रत्येक कणा-कणात विराजमान आहे शिव, श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा पाठवा!
Ashadhi Ekadashi 2024: अवघा रंग एक झाला!! संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरी झाली आषाढी एकादशी

> ॐ मध्ये आहे आस्था, ॐ मध्ये विश्वास,
ॐ मध्ये आहे शक्ती, ॐ मध्ये सर्व संसार,
ॐ ने करा दिवसाची चांगली सुरूवात,
श्रावणी सोमवारच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

> दुःख दारिद्रय नष्ट होवो

सुख समृद्धी दारी येवो

या श्रावण सोमवारच्या

शुभ दिवशी तुमच्या सर्व

मनोकामना पुर्ण होवो!

Sawan 2024 Wishes: प्रत्येक कणा-कणात विराजमान आहे शिव, श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा पाठवा!
Happy Guru Purnima 2024: 'हे' मेसेज पाठवून आपल्या गुरुजनांचे माना आभार; बघा शुभेच्छा संदेश!

> अदभुत आहे तुझी माया,

नीळकंठाची तुझी छाया,

अमरनाथमध्ये केला वास,

तुच आमच्या मनात वसलास.

हर हर महादेव…

श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

> पहिल्या श्रावणी सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

भगवान शंकराची कृपा आपणा सर्वावर अशीच राहो ही सदिच्छा!

Sawan 2024 Wishes: प्रत्येक कणा-कणात विराजमान आहे शिव, श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा पाठवा!
Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशी का साजरी केली जाते? जाणून घ्या महत्त्व आणि पूजेची वेळ

(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in